टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मंगळवेढा, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आठवडा बाजार सेंद्रिय कट्टा येथे आज गुरुवार सकाळी १०.०० ते १.०० या वेळेत
रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सदरील रानभाजी महोत्सवाचे उदघाटन आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते व पंढरपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी बाळासाहेब लांडगे यांचे उपस्थितीत होणार असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी मनीषा मिसाळ यांनी दिली.
सध्याच्या आहारातून लुप्त होणाऱ्या रानभाज्यांची माहिती देणे, लोकांनी आहारात समावेश करावा यासाठी कृषि विभाग प्रयत्न करीत आहे.
सदर रानभाजी महोत्सवामध्ये पावसाळा हंगामात नैसर्गिकरीत्या येणाऱ्या व कुठलेही रासायनिक औषधे न वापरलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल लावण्यात येणार आहे.
या रानभाजी महोत्सवामध्ये आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुणकारी पचनासाठी हलक्या व पोषण मूलद्रव्य व जीवनसत्वाने भरपूर असलेल्या तालुक्यामध्ये पिकणाऱ्या रानभाज्या
उदा. कडवंची, चिघळ, तांदुळसा, अळू, काटेमाठ, शेवगा, पाथरी, हादगा, आघाडा, भुईआवळा, सराटे, टाकळा, केना, कुरडू, कुंजीर, कपाळफोडी, गुळवेल, घोळ, अंबाडी, चुका, चकवत, राजगिरा, इत्यादी
नैसर्गिक खापरखुटी पिकणाऱ्या व फक्त पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन तालुका कृषि अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज