मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापुरात विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यूझाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात ही घटना घडली आहे. बसवराज शिवानंद पाटील (वय 34) आणि रविकांत धोंडप्पा नाईकवाडे (वय 37) दोघेही राहणारे हत्तूर अशी मृतांची नावे आहेत.
तर दुसरीकडे पावसामुळे पाणी साचलेल्या डबक्यात पडून 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापुरातल्या नई जिंदगी परिसरातील देसाई नगर इथं घडली आहे.
विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याची आठवड्याभरातील तिसरी घटना
विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याची आठवड्याभरातील सोलापूर जिल्ह्यातील तिसरी घटना आहे. या आधीच्या दोन घटनामध्ये विजेचा धक्का लागू चौघांचा मृत्यू झाला होता. हत्तूर येथे घडलेल्या घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोघेही व्यक्ती शिवारात शेती काम सुरू असताना ट्रॅक्टरवर काम करत होते.
ट्रॅक्टरवर लावलेला लोखंडी पाईप, वरुन गेलेल्या विद्युत तारेला लागला आणि त्यामुळं ट्रॅक्टरमध्ये अचानक करंट उतरला. या भीषण अपघातात दोघेही जागीच बेशुद्ध झाले. या घटनेनंतर तातडीनं त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं.
मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आलं आहे. घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी आणि नातेवाईंकांनी सिव्हिल रुग्णालयात गर्दी केली आहे. या दुर्घटनेमुळे हत्तूर गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पावसामुळे पाणी साचलेल्या डबक्यात पडून 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पावसामुळे पाणी साचलेल्या डबक्यात पडून 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोलापुरातल्या नई जिंदगी परिसरातील देसाईनगर इथं घडली आहे. आहिल उस्मान शेख असं मृत 9 वर्षीय मुलाचं नाव आहे. आहिल काल 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडला होता.
मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. नातेवाईक व शेजाऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो कुठेही सापडला नव्हता. काल दुपारी 2 च्या सुमारास देसाई नगर येथील एका प्लॉटिंग परिसरातील ड्रेनेजच्या मेन हाऊसजवळ साचलेल्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धवस्थेत आहिल याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी उपचाराचा पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज