टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथे आज रेनबो किड्स प्रि-प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’ चा या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती श्री शिवपार्वती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.विजय धायगोंडे यांनी दिली आहे.
मंगळवेढ्यातील दक्षिण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी डॉ.विजय धायगोंडे व डॉ.सुनिता धायगोंडे यांनी पाहिलेले स्वप्न आज सत्यात साकार होत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण हे असणार आहेत.
याप्रसंगी सलगरचे सरपंच सुदाम कदम, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग कांबळे, उपसरपंच कुमार स्वामी, आसबेवाडीचे सरपंच शाम आसबे, आसबेवाडीचे पोलीस पाटील महेश आसबे, वसंत आसवे सर, लवंगीचे सरपंच पूनम हुवाळे, माजी सरपंच अप्पा माने,
मुक्ताई मतिमंद मुलाचे बालगृह संस्थापक अध्यक्ष शिवाजी जाधव, माजी सरपंच विठ्ठल सरगर, जंगलगी सरपंच आमसिद्ध चौखंडे, उपसरपंच चंद्रकांत चौखंडे, माजी सरपंच राजकुमार बिराजदार, पौटचे सुरेश निमंगरे, माजी सरपंच राजाराम निमंगरे, सलगरचे माजी सरपंच तानाजी जाधव,
तंटामुक्त अध्यक्ष दत्ता टिक्के, डॉ.नितीन बिराजदार विद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाप्पा बिराजदार, विठ्ठल बिराजदार,
शिक्षण प्रसारक मंडळ सचिव सुशील मेनगुदली, व नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंगळवेढा सर्व डॉक्टर पदाधिकारी कर्मचारी आदीजन उपस्थित राहणार आहेत.
आज होणाऱ्या रेनबो किड्स प्रि-प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन इमारत उद्घाटन समारंभ प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सरपंच शिवशंकर धायगोंडे, डॉ.विजय धायगोंडे, डॉ.सुनीता धायगोंडे, सौ.पवित्रा व बसवराज धायगोंडे व मुख्याध्यापक संतोष काशीद यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण
रेनबो किड्स प्रि-प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. भविष्याचा विचार करता, मुलांना संतुलित आणि शाश्वत शिक्षण मिळावे, जागतिक स्तरावर ओळखले जाणारे शिक्षण मिळावे म्हणून ‘रेनबो किड्स प्रि-प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’ला पसंती दिली जात आहे.
क्रिडो अभ्यासक्रम; खेळातून अभ्यासाची गोडी
विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी ‘रेनबो किड्स प्रि-प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’मध्ये खेळातून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रणालीचे अभ्यासक्रम शिकवला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याची मोठी गोडी लागली आहे.
जागतिक पातळीवर मानांकित असा अभ्यासक्रम
अद्ययावत आणि काळाशी सुसंगत अभ्यासक्रम, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर मानांकित असा अभ्यासक्रम, याशिवाय सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात इंग्रजी, विज्ञान, गणितासह; शाळांमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्यांना असणारे विशेष महत्त्व यामुळेही पालक या ‘रेनबो किड्स प्रि-प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’मध्ये पाल्याचा प्रवेश घेण्यास इच्छुक असल्याचे दिसून येते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज