मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या नवीन प्रभाग रचनेवर जिल्ह्यातून एकूण १९ हरकती आलेल्या आहेत. या हरकतींचा अहवाल जिल्हा प्रशासनाने ईमेलद्वारे विभागीय आयुक्तांकडे पाठवला असून यावर ४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे. सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे.

नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर प्रशासकीय बाजू मांडण्यासाठी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच त्यांचे सहकारी अभ्यास करत आहेत. ज्या गट आणि गणाविरोधात हरकती आलेल्या आहेत, त्या गावाची भौगोलिक माहिती, लोकसंख्या यासह इतर माहितीचे संकलन अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

मंगळवारी सकाळी उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी त्यांच्या कार्यालयात सर्व गट, गण तसेच संबंधित तालुक्याचा नकाशा पाहून हरकतदारांचीही बाजू त्यांच्या सहकाऱ्यांकडून समजावून घेतली.
विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होताना प्रशासकीय बाजू मांडणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकारी हरकतींवर अभ्यास करीत आहेत.

हरकतदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर विभागीय आयुक्त ११ ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय देणार आहेत. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम प्रभाग रचना (गट अन् गण) जाहीर होणार आहेत.

कुठे काय हरकती आहेत?
करमाळा तालुक्यातील विहाळ गाव वीट जिल्हा परिषद गटातून कमी करून झरे गावात समावेश करा, अशी हरकत गणेश चिवटे यांनी घेतली आहे. विहाळ हे गाव कोर्टी गणात समावेश करून पिंपळवाडी व करमाळा ग्रामीण भागातील गावे वगळावे, अशी मागणी संजय जाधव यांनी केली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी हे गाव वळसंग काढून कुंभारी गटात समावेश करा, अशी मागणी इंद्रजीत लांडगे यांनी केली आहे. दक्षिणमधील राजूर हे गाव औराद पंचायत समितीच्या गणातून समावेश करा, अशी मागणी सोमलिंग देवकते यांनी घेतली आहे.
उत्तर सोलापूर मधील खेड हे गाव कोंडी गटामध्ये समावेश न करता दारफळ बीबी गटात समावेश केल्याबद्दल सोमनाथ काळे यांनी हरकत घेतली. माळशिरस तालुक्यातील दहिगाव गट रद्द करून मोरोची गटाची निर्मिती करावी, अशी हरकत महेश थिटे यांनी घेतली आहे.

ज्यांनी हरकत घेतली आहे, त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहणे गरजेचे आहे. तशी नोटीस आम्ही संबंधितांना पाठवत आहोत.-संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी, (महसूल) सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














