मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
उजनी धरणातून शनिवार, दि.२६ जुलै रोजी सायंकाळी १५ हजार क्युसेक्स विसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यास पुन्हा सुरुवात झालेली आहे. रात्री दहापर्यंत हा विसर्ग २५ हजार क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात येईल, अशी माहिती उजनी धरण
जलसंपदा विभागचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली. तसेच भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असा इशाराही देण्यात आलेला आहे.
मे अखेर आणि जून मध्ये झालेल्या पावसामुळे उजनी शनिवार, दि. २६ जुलै उजनीची सायंकाळची स्थिती
पाणीपातळी : ४९६.६२० मीटर, एकूण साठा : ११४.७६ टीएमसी, उपयुक्त साठा: ५१.१० टीएमसी, टक्केवारी : ९५.३६ टक्के
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
धरणात ९५ टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा होऊन आतापर्यंत ३४ टीएमसी पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले आहे.
दि.२३ जुलैपासून पुणे जिल्हा, लोणावळा पश्चिम भाग, मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर या परिसरात पुन्हा दमदार व संततधार पाऊस सुरू झालेला असल्यामुळे त्या भागातील मुळा-मुठा, पवना आणि इंद्रायणी या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे दौंड येथून उजनीत
येणाऱ्या विसर्गात वाढ होऊन सध्या तो २० हजार ३३६ क्युसेक्स पर्यंत पोहोचलेला आहे व यात प्रत्येक तासाला वाढच होत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी ५ हजार क्युसेक्स तर सायंकाळी १५ हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
यामध्ये दौंड येथून जलाशयात येणाऱ्या पाण्याचा विचार करून कदाचित विसर्गामध्ये २० ते २५ हजार क्युसेक्स पर्यंत वाढ होईल असेही धरण नियंत्रण विभागाकडून कळवण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज