टीम मंगळवेढा टाईम्स न्युज ।
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम २०२५ मध्ये मंगळवेढा तालुक्यातील बाजरी, तूर, मका, कांदा आदी पिकासाठी पीकविमा हप्ता भरण्याची अंतिम दि.३१ जुलै असून आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन पिक विमा हप्ता भरावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा मनीषा मिसाळ यांनी केले आहे.
विमा हप्ता भरत असताना सोबत शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला असावा म्हणजे ऍग्रिस्टॅक नोंदणी केलेली असावी तसेच पिक पाहणी अॅपमधून पिक नोंदणी केलेली असावी.
त्यासोबत सातबारा उतारा, बँक पासबुक , आधार कार्ड पीक पेरणी बाबतचे स्वयंघोषणापत्र घेऊन सोबत विमा हप्ता भरून आपला सहभाग नोंदवावा,
ई पीक पाहणी व विमा घेतलेल्या पीक व क्षेत्र यामध्ये तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल व भरलेला विमा हप्ता जप्त होईल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
तसेच पिक विमा हप्ता प्रत्येक पिकासाठी वेगळा असून तो पुढील प्रमाणे प्रति हेक्टर – बाजरी साठी ७६.३५ रु तूर साठी ७४४.३६ रु मका साठी ५४० रु कांदा साठी ६८० रुपये असून
सदर पिकासाठी विमा संरक्षित रक्कम पुढील प्रमाणे बाजरीसाठी ३५३८ रुपये, तूर साठी ३७२१८रु मकासाठी ३६०००रु कांदा साठी ६८००० रुपये आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज