टीम मंगळवेढा टाईम्स : राजेंद्र फुगारे
चारचाकी वाहनाने धडक देऊन आणि नंतर बंदुकीचा धाक दाखवत, लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करत जीम ट्रेनर तरुणाला जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज इंदापूर जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला.
दि. १६ जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जीम ट्रेनर असलेले यातील फिर्यादी संकेत जाधव (वय ३८, रा. इंदापूर) हे मोटरसायकलवरून घरी जात होते. यादरम्यान, संजय जगन्नाथ सोनवणे, योगेश सोनवणे,
संकेत सोनवणे, सुहास सोनवणे, सुनील सोनवणे (सर्व रा. तरडगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी अज्ञात कारणावरून त्यांच्या अंगावर चारचाकी गाडी घातली. त्यांना मोटरसायकलवरून खाली पाडले.
याच वेळी समोरून दुसरी चारचाकी गाडी आडवी लावण्यात आली. दोन्ही वाहनांमधून उतरलेल्या ८ ते १० जणांनी बंदुकीचा धाक दाखवत जाधव यांना लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम व अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, यातील संजय सोनवणे यांनी ॲड. सिद्धेश्वर चव्हाण यांच्या मार्फत इंदापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. यात युक्तिवाद करताना ॲड. चव्हाण यांनी, आरोपी संजय सोनवणे हे प्रतिष्ठित, सक्रीय राजकारणी आहेत.
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचा वाढता राजकीय प्रभाव सहन होत नसल्याने त्यांना या खोट्या गुन्ह्यात गुंतवले आहे. वास्तविकपणे आरोपी हा घटने दिवशी पुणे शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी होते.
गुन्ह्याची ठिकाणी हजर नव्हते. असे नमूद करून त्याबाबतचे पुरावे ॲड. चव्हाण यांनी न्यायालयात सादर केले. सरकारी वकिल प्रसन्न जोशी यांनी याला आक्षेप घेत आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली.
मात्र, अर्जदार यांच्यावतीने दाखल केलेल्या कागदपत्रांचा व मुद्द्यांचा विचार करून न्यायालयाने काही अटीसह संजय सोनवणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
आरोपी तर्फे ॲड. सिद्धेश्वर चव्हाण पंढरपुर, ॲड. राजू पाटील, ॲड. नितीन वाघमारे, ॲड. दत्तात्रय गेजगे, ॲड.शुक्ल, ॲड.भंडारी तर फिर्यादीतर्फे सरकारी वकील जोशी मूळ फिर्यादीतर्फे ॲड. श्री गलांडे यांनी कामकाज चालविले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज