मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kirtankar Nivruti Maharaj Deshmukh (Indurikar) Filed charges against him for making controversial statements
इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता.
या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चं उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यानि त्यांना नोटीस पाठवली होती. यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांन मार्फत बाजू मंडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती.
त्यामुळे अखेर 19 जूनला संगमनेर इथल्या वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी कोर्टात गुन्हा दाखल केला. खरंतर इंदुरीकरांच्या या विधानामुळे वाद चांगला तापला होता. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विधानावरून सुरू असलेला वाद थांबता थांबेना, असंच चित्र होतं. यात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यादेखील आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदुरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. Indurikar Maharaj was surrounded by ‘that’ statement; Finally filed a crime
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज