मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथे विहिरीवरील विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले असता पाय घसरून विहिरीत पडून डॉक्टर असलेल्या ३८ वर्षीय तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, यातील मयत सिध्दरामेश्वर तुकाराम गणपाटील (वय ३८, रा. मरवडे) हे मौजे तळसंगी गावच्या
शिवारातील शेतामध्ये सध्या रहावयास आहेत. दि.९ जुलै रोजी सायंकाळी ६.१८ वा. शेतात ऊस लागवड करावयाचे काम चालू असल्याने
मयत हे मोटर चालू करण्याकरीता विहिरीजवळ गेले असता त्यांचा तोल जावून विहिरीत पडून गंभीर जखमी होवून ते बेशुध्द झाले.
या घटनेची माहिती खबर देणारे मयताचे भाऊ निरंजन गणपाटील यांना मिळताच त्यांनी इतर लोकांच्या मदतीने विहिरीतून त्यांना बाहेर काढून
बेशुध्द अवस्थेत मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता आणले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, डॉ. गणपाटील हे मंगळवेढा – पंढरपूर रोडवर आधार आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर चालवित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज