मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
एका शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी सात लाख रुपये बँक खात्यात साठवले होते; पण सहावीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाने मोबाइलवर ‘फ्री फायर’ गेम खेळताना नकळत काही अॅप घेतले आणि काही क्षणात बँक खात्यातील पाच लाखांची रक्कम गायब झाली. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील घडली आहे.
खात्यातील पैसे गेल्याच्या मेसेजमधील ट्रान्झेक्शन आयडीवरून सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. बैंक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाइल नंबर लहान मुलांच्या हाती दिल्यानंतर काय होऊ शकते, याचा धडाच पालकांना मिळाला.
राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशींचा गोठा करून चांगला जम बसवला होता. नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते.
शेतकऱ्याची सायबर पोलिसांकडे धाव
मे महिन्यात ते हरयाणातून चार म्हशी आणणार होते. यासाठी बँकेत जाऊन खात्यात साठवलेल्या पैशांची माहिती घेताच त्यांना धक्का बसला.
खात्यावर फक्त दोन लाख रुपये शिल्लक होते. स्टेटमेंट काढल्यावर खात्यातून ऑनलाइन पैसे गेल्याचे लक्षात आले. बँकेने हात झटकून पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.
शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी शेतकऱ्याच्च्या मोबाइलपासून तपासाला सुरुवात केली.
बँकेचा मेसेज नाही स्टेटमेंटवरुन उलगडा
बँकेतील स्टेटमेंटनुसार मोबाइलमधील मेसेज तपासले. मात्र, त्यात एकही मेसेज नव्हता. ट्रान्झेक्शन आयडीवरून शोध घेतल्यानंतर काही रक्कम फ्री फायर गेममधील आभासी शस्त्र खरेदीसाठी गेल्याचे लक्षात आले.
बरीच रक्कम सायबर गुन्हेगारांनी छुप्या अॅपद्वारे मोबाइलचा ताबा घेऊन विविध खात्यांवर वळविल्याचे स्पष्ट झाले. हा सर्व प्रकार त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाकडून नकळत घडला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज