मंगळवेढा टाइम्स न्युज ।
पंढरपूर आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेवून गावाकडे परतत असताना बंदाप्पा म्हाळाप्पा कांबळे (वय ६२ रा. शिवणगी) यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक देवून गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस तर विठ्ठल ऐवळे यांना गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी
वाहनचालक रियाजसाब माबुसाब पिंजार रा. करूर ता. राणाबेन्नूर (कर्नाटक) याच्या विरूद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला – असून पोलिसानी चालकास ताब्यात घेतले आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी – ज्ञानेश्वर कांबळे (रा.शिवणगी) यांचे मयत वडील बंदाप्पा कांबळे हे दि.५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता नातेवाईक विठ्ठल ऐवळे (वय ७ असे दोघे – एस.टी.बस ने आषाढी वारीकरीता पंढरपूर येथे गेले होते.
दि.६ जुलै रोजी विठ्ठलाचे दर्शन घेवून ते आपल्या मूळ गावी परतत असताना मरवडे हद्दीत सह्याद्री हॉटेलच्या समोर वाहनाची वाट पाहत बसले असताना मरवडे कडून उमदीकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो क्र. के.ए.६८-५८१४ वरील
आरोपी तथा चालक रियाजसाब पिंजार याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून बंदाप्पा कांबळे व विठ्ठल ऐवळे या दोघांना जोराची धडक दिल्याने बंदाप्पा हे जागीच मृत्यू झाले तर विठ्ठल हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमीना मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याची फिर्याद ज्ञानेश्वर कांबळे यांनी दिल्यावर टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलिस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज