मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांच्या मेळ्याने पंढरपूर सजले. वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आले. आषाढ धारा कोसळत असताना भक्तीरसात वारकरी चिंब झाले. विठ्ठल दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळली होती.
सुमारे २० लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. विठू नामाच्या जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. मानाचा वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या दांपत्याला मान मिळाला.
गेल्या पंधरा वर्षांपासून ते वारीला येत आहे. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना- मुख्यमंत्री
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पंढरपूर कॉरिडोरसाठी सर्वांना विश्वासात घेणार
शनिवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लावून पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करुन २०१८ वर्षीपासून निर्मलवारी सुरुवात केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली.
जी पावले विठुरायाच्या दर्शनाच्या आशेने चालतात, त्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचा प्रत्यंतर यावा, या सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने चरणसेवा उपक्रम राबवून वारकऱ्यांचे सेवा केली. त्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंढरपूर कॉरिडोरसाठी सर्वांना विश्वासात घेणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आषाढी एकादशी निमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे.आज सकाळपासूनच आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज