मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अनेक वर्षापासून सुरू असलेल्या पंढरपूर आषाढी वारीमध्ये यंदा सर्वसामान्य वारकऱ्यांची आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी व्हीआयपी दर्शनाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही अंशी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
त्यामुळे सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार असून व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शनाबाबत काही सक्त सूचना केल्या असून यामध्ये मंदिरापर्यंत व्हीआयपींच्या गाड्यांना प्रतिबंध घातला आहे.
तसेच महापूजेदरम्यान मोजक्याच लोकांना गाभाऱ्यात सोडण्यात येणार आहे. तसेच उत्सवाच्या दिवशी दर्शन रांगेतूनच सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे
त्यामुळे मंत्री महोदयाच्या पाठीमागे शिरणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून मंत्री महोदयाच्या अत्यंत जवळच्या केवळ चार ते पाच लोकांनाच प्रवेश देण्यासंदर्भात प्रशासनाने चर्चा केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज