टीम मंगळवेढा टाईम्स । संपादक – समाधान फुगारे
धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा शाखा आंधळगाव यांच्या स्वमालकीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन आज सोमवार दि.१६ जून रोजी दुपारी 2.30 वाजता होणार आहे.
सदर वास्तूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते तर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा.डॉ.लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, सोलापूर मार्केट कमिटीचे चेअरमन दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील,
सांगोल्याचे माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, सोलापूर डीसीसी बँकेचे माजी व्हा. चेअरमन बबनराव आवताडे,
सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, मंगळवेढा निबंधक व्ही. व्ही.वाघमारे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी चेअरमन शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत,
दामाजी शुगरचे व्हा. चेअरमन तानाजी खरात, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लतीफ तांबोळी, शिवसेनेचे प्रा.येताळा भगत, माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, शिवसेना (शिंदे गटाचे) तालुकाप्रमुख अशोक चौंडे, मंगळवेढा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांचेसह इतर मान्यवर व आंधळगाव परिसरातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत.
केवळ १३ वर्षांच्या अल्प कालावधीत १२०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल
धनश्री मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या ३५ शाखा कार्यरत असून केवळ १३ वर्षांच्या अल्प कालावधीत १२०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल सुरू आहे. राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्या स्पर्धेत संस्था सामान्य लोकांच्या गरजा तत्काळ पूर्ण करत सामाजिक बांधिलकी जपत लोकाभिमुख सेवा पुरवत आहे.
लोकांच्या मदतीस तत्पर राहून समाजातील विश्वास संपादन केला
संस्थेने नेहमीच लोकांच्या मदतीस तत्पर राहून समाजातील विश्वास संपादन केला आहे. आर्थिक संस्थेच्या माध्यमातून हा जनसेवेचा वसा नेहमीच जपला जाईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
तरी सदर आज उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व सभासद खातेदार, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संचालक मंडळांने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज