मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शिवसेनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पण उभी फूट पडली होती. अजितदादांच्या नेतृत्वातील गटाने सत्तेची कास धरली तर दुसरीकडे शरद पवारांचा गट विरोधी बाकांवर बसला. पण या गटातील आमदारांना सत्ता खुणावू लागली आहे.
त्यांना विरोधी बाकांची ऊब मानवेना. आता त्यांना जनता आणि कामे आठवली आहेत. त्यांनी सत्तेत जाण्याचा सूर आळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपण सत्तेत भागीदार असायला हवे अशी मागणी या आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा रंगात आहे. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे अचूक टायमिंग साधले आहे. तरीही आशेची धुकधूक कायम आहे.
दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात अशी हलगी वाजली. त्यादृष्टीने दोन्ही राष्ट्रवादीत चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीतील आमदार विरोधी बाकावर अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यांना सत्तेचे वेध लागले आहेत. त्यांना आता सत्ता खुणावत आहे. विरोधी बाकावर राहून कामे होत नसल्याची सूर त्यांनी वरिष्ठांसमोर आळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आमदार अस्वस्थ, खासदार पवारांच्या पाठीशी
मतदारसंघातील कामे होत नसल्याने आमदार अस्वस्थ झाले आहेत. आपण सत्तेत जायला हवे अशी आग्रही मागणी या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मतदारसंघातील कामे आणि त्यांना मिळणारा निधी यावरून त्यांनी तक्रारीचा सूर आळवला आहे. सत्तेत असल्यावर निदान कामं तरी करता येईल अशी भूमिका त्यांनी मांडली. तर दुसरीकडे खासदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. पवार जी भूमिका घेतील, त्याला त्यांचा पाठिंबा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पवारांचा भाजपाशी युतीस नकार
दरम्यान शरद पवार यांनी भाजपासोबत जाण्यास नकार दिला आहे. भाजपासोबत जाण्यास शरद पवार तयार नसल्याचे समोर येत आहे. भाजपासोबत युती करायची नाही असे पवारांचे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता आमदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे खासदारांनी मात्र पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज