मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण भीमा नदी पात्रातून विना रॉयल्टीची वाहने भरुन जात असल्याची जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीचा रोष मनात धरुन सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रावसाहेब बेदरे (वय – ४५, रा. उचेठाण)
यांना लोखंडी टॉमीने मारुन गंभीर जखमी करीत खिशातील चार हजार रुपये व रेडमी कंपनीचा मोबाईल, साडे पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या जबरदस्तीने काढून घेतल्या प्रकरणी नामदेव निकम, माऊली निकम (रा.कुरुल) या दोघा विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा जखमी दत्तात्रय बेदरे हे दि.२१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता उचेठाण येथील घरासमोर उभा असताना भिमा नदी पात्रातून वाळूने भरलेले टिपर घरासमोरुन जात होते.
त्यावेळी फिर्यादीने जिल्हाधिकारी यांना फोन केला मात्र फोन उचलला नाही. त्यानंतर मंगळवेढ्याचे प्रभारी तहसिलदार संतोष कणसे यांना फोन केला व विना रॉयल्टीचे टिपर सुर्यास्त होवूनही जात आहेत असे सांगितले असता तहसिलदार यांनी महसूलचे कर्मचारी पाठवतो असे म्हणाले.
सदर वाहनांचा फिर्यादीने व्हिडीओ काढून गौणखनिज अधिकारी दिव्या वर्मा यांच्या मोबाईल व्हॉटसअपवर पाठविला. या दरम्यान उचेठाणचे उपसरपंच संगिता सोनवले यांनी भेटण्यासाठी घरी बोलविले.
फिर्यादी व ज्ञानेश्वर साखरे मोटर सायकलवरुन सरपंचाच्या घराकडे जात असताना २० टिपर रस्त्यावर वाळूने भरुन जुना सरकोली रस्ता ते उचेठाण ओढा या दरम्यान उभे होते.
यावेळी वरील दोन आरोपींनी टिपर मधून उतरुन फिर्यादीस थांबण्यास सांगितले. यावेळी तूच कलेक्टर साहेबाकडे वाळू ठेक्यातून विना रॉयल्टीची वाहने भरुन जातात अशी तक्रार का दिली? असे म्हणून शिवीगाळ करीत याला मारा असे म्हणत दोन्ही आरोपींनी फिर्यादीच्या दोन्ही पायावर, मागील पृष्ठभागावर मारहाण करुन गंभीर जखमी केले.
तसेच फिर्यादीच्या खिशातील चार हजार रुपये, रेडमी कंपनीचा मोबाईल, साडे पाच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या घेवून सदर आरोपी घेवून गेले असल्याचे बेदरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास बोराळे बीटचे पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.
दरम्यान वाळू ठेका सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत विविध खंडणीचे, अॅट्रासिटीचे व मारहाणीचे असे एकूण तीन गुन्हे पोलीसात दाखल झाले आहेत. वाळू वरुन मोठ्या प्रमाणात भविष्यातही राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी गांभीर्यपूर्वक या घटनेचा विचार करुन तात्काळ सदर ठेका लॉक करावा अशी सुज्ञ नागरिकातून मागणी पुढे येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज