मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पैठण शहरालगत शहागड रोडवरील वीटभट्टीवर काम करणाऱ्या १३ मजुरांना शिळे चिकन खाल्ल्याने शनिवारी विषबाधा झाली. त्यात ३३ वर्षीय महिलेचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.
ललिता प्रेमलाल पालविया (रा. चक्की बडा मोहल्ला, जमधड, जि. खंडवा, मध्य प्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे.
इतर १२ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मजूर उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.
शहागड रोडवर अनेक वीटभट्ट्या असून या ठिकाणी मध्य प्रदेशचे मजूर काम करतात. शुक्रवारी आठवडी बाजारातून काही जणांनी चिकन, मासे घेतले.
शनिवारी सर्वांनी जेवण केल्यानंतर र १३ जणांना मळमळ, उलटीचा त्रास झाला. त्यामुळे सर्वांना पैठणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना ललिता पालविया या महिलेचा मृत्यू झाला, तर गंगाकिशोर ठाकरे (२४, रा. गाव दोमालिया, उत्तर प्रदेश), मंगल ठाकरे (४४), सुखराई ठाकरे (४२), सीमा ठाकरे (१७), दीपक ठाकरे (१५), संजय ठाकरे (१२), विमलाबाई गौतम (३८), संगीता गौतम (१८),
सलिता गौतम (१९), फुलमती ठाकरे, शिवांगी प्रेम पालवी (७), राजपाल गौतम (११), राज गौतम (१४, सर्व रा. मध्य प्रदेश) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉ. विष्णू बाबर यांनी सांगितले. विषबाधेची घटना समोर आल्यानंतर रुग्णांना तातडीने उपचारासाठी हलवले. त्यामुळे वेळेत उपचार मिळाले.
शुक्रवारी आणलेले चिकन सर्वांनी शनिवारी खाल्ले
शिळे चिकन खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाने सांगितले. शुक्रवारी आणलेले चिकन शनिवारी खाल्ल्यामुळे सर्वांना त्रास झाला, असे मंगल ठाकरे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज