mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकरी बांधवांनो! अडचणी संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी बोलावली अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक; उद्या पिक विमा संदर्भातील लेखी तक्रारी घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 9, 2025
in मंगळवेढा, सोलापूर
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मंगळवेढा तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023-2024 रब्बी 2023-24 हंगामातील नुकसान भरपाई वाटप रक्कम, प्रलंबित रक्कम यासंदर्भात तालुका कृषी कार्यालय मंगळवेढा येथे उद्या शनिवार दि.10 मे रोजी आ.समाधान आवताडे,

विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक, जिल्हा कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली असून ज्या शेतकरी बांधवांच्या पीक विमा योजनेसंदर्भात अडचणी आहेत.

त्यांनी लेखी अर्जासह बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन आ.समाधान आवताडे संपर्क कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 23-24 खरीप रब्बी हंगामामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता.

परंतु विमा कंपन्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात आमदार समाधान आवताडे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

या तक्रारीची दखल घेत आमदार समाधान आवताडे यांनी शासनाकडे व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता.

त्या अनुषंगाने तालुक्यातील मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023, 2024 रब्बी 2023, 24 हंगामातील अस्विकृत पूर्वसूचना, स्विकृत पूर्वसूचना,

नुकसान भरपाई वाटप रक्कम, प्रलंबित रक्कम मिळावी यासाठी आ. समाधान अवताडे यांच्यासमवेत पीक विमा कंपनीचे क्षेत्रिय व्यवस्थापक विनायक दिक्षित जिल्हा कृषीअधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या उपस्थितीत बैठक लावण्याचे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी निर्देश दिलेले आहे.

तालुका कृषि अधिकारी कार्यालय बैठक

त्यानुसार उद्या शनिवार दि.10 मे रोजी सकाळी 9 वा तालुका कृषि अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे वरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीच्या वेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांनी पिक विमा संदर्भातील आपल्या तक्रारी लेखी निवेदनाद्वारे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार समाधान आवताडे संपर्क कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.

ट्रेलर आला, पिक्चर अजूनही बाकी. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी 36 तासात काय काय केलं? लष्कराला पूर्ण सूट

भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ९ तळं उद्धवस्त करण्यात आल. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय जवानांनी बदला घेतला.

यावेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी मोठी कारवाई केली. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.

भारताचे हे ऑपरेशन इथेच थांबणार नाही. लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ते सुरूच राहणार आहे, असा स्पष्ट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ मंगळवारी रात्री १ च्या सुमारास सुरु झाले. त्यानंतर साधारण २५ मिनिटे हे ऑपरेशन सुरु होते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले. भारताची ही कारवाई केवळ एक ट्रेलर असून, खरा पिक्चर अजून बाकी आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली.

सध्या ऑपरेशन सिंदूरमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. या ऑपरेशनला ३६ तासांहून अधिक काळ लोटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑपेरेशनच्या वेळेपासूनच सक्रिय आहेत. ते स्वतः या लष्करी कारवाईवर लक्ष ठेवून होते.

अजित डोवाल यांच्यासोबतही बैठक

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानतंर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS) बैठक घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जागतिक अंतराळ अन्वेषण परिषदेला संबोधित केले.

भारताची अंतराळ यात्रा इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर एकत्रितपणे उंची गाठण्यासाठी आहे. भारत लवकरच एक विशेष जी-२० उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

मोदींची केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी बैठकीदरम्यान पाकिस्तानविरुद्ध चालवलेल्या ऑपरेशनची माहिती आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिली.

या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

तसेच संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असेही त्यांना सांगितले. भारतीय लष्कराने तयारीनुसार कोणतीही चूक न करता ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराची खूप प्रशंसा केली.

यानंतर बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी राष्ट्रपतींना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सध्या मोदी हे पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. ते सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडत भारतात परतले. त्यानंतर २३ एप्रिल रोजी सीसीएसची बैठक घेऊन पाकिस्तानवर कठोर निर्णय घेतले.

लष्कराला पूर्ण सूट

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू जल करार रद्द केला होता. यासोबत, राजकीय संबंधांमध्ये कपात केली आणि पाकिस्तानसोबतचा व्यापारही बंद केला. पंतप्रधान मोदी एकीकडे ही कारवाई करत असताना दुसरीकडे बैठकांवर बैठका पार पडत होत्या.

या बैठकीत मोदी व्यस्त होते. ते सतत लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होते. यावेळी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. पंतप्रधान मोदींकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.

भारताची सक्षमता आली दिसून

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र माऱ्यांना तत्काळ आणि चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे संभाव्य हाणी टळली. यात भारताची संपर्क यंत्रणा आणि वायूदल किती दक्ष आहे याचाच प्रत्यय यानिमित्ताने आपल्या शत्रूराष्ट्राला आला आहे. या प्रतिसादाचे वर्णन क्लिनिकल आणि नियंत्रित असे करण्यात आले आहे, पश्चिम सीमेवरील उच्च तयारी दर्शवते.

कोणतीही जीवीतहाणी नाही

रिपब्लिक न्यूजने दिलेल्या वृ्त्तानुसार, पाकने क्षेपणास्त्र डागल्यानंतर कोणतीही नागरी जीवितहानी किंवा पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी प्रक्षेपणांच्या उत्पत्ती आणि स्वरूपाचा पुढील तपास करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

गुरुद्वाराजवळ एक तोफगोळा पडला, ज्यामुळे त्याच्या बाह्य रचनेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गुरुद्वाराच्या भिंतींवर गोळीबाराच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

संशयास्पद ड्रोन स्फोट

भारत-पाकिस्तान सीमेजवळ, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा भागात हाय-टेन्शन पॉवर लाईनशी आदळल्यानंतर एक संशयास्पद ड्रोन स्फोट झाला. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु त्यामुळे मोठा सुरक्षा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या

ऑपरेशन सिंदूरच्या एक दिवसानंतर, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ शहरातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून विनाकारण तोफगोळ्यांचा मारा केला. त्यानंतर फायरिंगही केली होती. दरम्यान, आता पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या असून गोळीबारासारख्या घटना आणि ड्रोनची घुसखोरी, सायबर हल्ले आणि सीमेलगत सुरु असलेल्या दहशतवादी हालचालीमुळे गुप्तचर संस्था अतिदक्षता बाळगून आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 13, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

October 12, 2025
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या संदर्भात आज सायंकाळी तातडीची बैठक

October 12, 2025
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

सभासदांनो! दामाजी कारखान्याची दिवाळी सणाच्या साखरेचे वाटप ‘या’ दिवसापासून सुरू होणार; चेअरमन शिवानंद पाटील यांची घोषणा

October 11, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा महिलाराज येणार; प्रश्नांची जाण असलेल्या महिलेचा शोध घ्यावा लागणार; पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

October 11, 2025
एक हात मदतीचा! मंगळवेढ्यातील अनाथ आणि दिव्यांग मुलांनी बनवल्या 5 हजार पणत्या; मुक्ताई अनाथ मतिमंद संस्थेकडून 9307286287 नागरिकांनी पणत्या खरेदी करण्याचे आवाहन

एक हात मदतीचा! मंगळवेढ्यातील अनाथ आणि दिव्यांग मुलांनी बनवल्या 5 हजार पणत्या; मुक्ताई अनाथ मतिमंद संस्थेकडून 9307286287 नागरिकांनी पणत्या खरेदी करण्याचे आवाहन

October 11, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

बापरे..! मंगळवेढ्यात असलेल्या ‘या’ बँकेत ठेवीदारांनी केली मोठ्या प्रमाणावर गर्दी; शाखेत ‘एवढ्या’ कोटींच्या ठेवी; ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट

October 10, 2025
Next Post
पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले; भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

खुशखबर! सोलापूर-मुंबई विमानसेवा ‘या’ दिवसापासून; पहिल्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस येणार सोलापूरला

October 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या नेमक्या तारखा आणि परीक्षा दिनक्रम

October 13, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आरक्षण सोडत जाहीर; गावगाड्यात राजकीय हालचालींना वेग; उमेदवारांची चाचपणी सुरू; तुमच्या गटात व गणात काय आरक्षण पडले?

October 13, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

इच्छुकांमध्ये उत्सुकता! जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत; मंगळवेढा पंचायत समितीची सोडत कुठे होणार? वाचा संपूर्ण माहिती

October 13, 2025
भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगामचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ उत्साहात; कारखान्याचे ६ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट पूर्ण करू; चेअरमन अनिल सावंत यांनी दिले शेतकऱ्यांना आश्वासन

October 12, 2025
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या संदर्भात आज सायंकाळी तातडीची बैठक

October 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..