mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मस्तवाल कर्मचारी! देवदर्शन करून घराकडे जाणाऱ्या कुटुंबीयांना टोल नाक्यावर मारहाण; टोल नाक्याच्या मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 8, 2025
in क्राईम, सोलापूर
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅनच्या कारणावरून टोल नाक्यावरील मॅनेजरसह आठ जणांनी मिळून देवदर्शन करून घराकडे परत जाणाऱ्या तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील पती पत्नीसह त्यांच्या दोन मुलांना हाताने, रबरी पाईप, वायर, काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना मंगळवार ६ मे रोजी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास घडली.

याप्रकरणी हरिंदर प्रताप रेड्डी रा. एच. आर. कॉम्पलेक्स चिक्कडपल्ली हैद्राबाद यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनकढाळ टोलनाक्यावरील मॅनेजर सुजीत कुमार, अक्षय महादेव पाटील, विठ्ठल रामचंद्र खांडेकर, संजय सिताराम बंडगर उर्फ गांधी, अमोल बाळासाहेब बंडगर व अज्ञात तीन इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिंदर प्रताप रेड्डी हे पत्नी चैतन्या, मुलगा श्रीश्वर, श्रीमान महादेव व चालक चंदर रामया नागीनी (रा. अमरपेठ हैद्रबाद) असे मिळून टी. एस. ०७/ई.ई. ६११६ या वाहनातून कर्नाटक राज्यातील गोकर्ण येथे देव दर्शनासाठी गेले होते.

६ मे रोजी सकाळी कोल्हापुर येथे महालक्ष्मीचे देवदर्शन करून पंढरपूरकडे जात होते. रात्री ९.३० ते १० च्या सुमारास अनकढाळ टोलनाका येथे आले असता टोलनाक्यावर रेड्डी यांच्या गाडीचे फास्ट टॅग स्कॅन झाले नाही. त्यानंतर सदरचा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

रेड्डी व त्यांचा दुसरा मुलगा श्रीश्वर असे गाडीतुन उतरून मारहाण करणाऱ्या लोकांना सोडवत होते. त्यावेळी सुमारे सात ते आठ लोकांनी रेड्डी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना रबरी पाईप, वायर, काठीने पाठीवर पायावर, डोकीत, कानावर तोंडावर मारहाण करून जखमी केले.

त्यातील काही लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळी केली. त्यावेळी भांडण बघून रेड्डी यांची पत्नी चैतन्या ही त्यांना सॉरी सॉरी असे म्हणून मारहाण करु नका असे म्हणत होती. त्यावेळी त्यांनाही काही इसमांनी हातावर पाईपने मारहाण केली.

त्यानंतर त्या लोकांनी गाडीच्या काचा व मोबाईल फोडून नुकसान केले आहे असे हरिंदर प्रताप रेड्डी यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

गाडी नंबर स्कॅन करण्यासाठी सांगितले असता दिली शिवी

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याने तुमच्या गाडीचे स्कॅन होत नाही, तुम्ही पैसे भरा असे सांगितले. यावर रेड्डी यांनी माझ्या गाडीचे नंबरवर स्कॅन करा असे सांगितले असता त्याने रागाने शिवी दिली. त्यावेळी रेड्डी यांचा मुलगा श्रीमान महादेव हा गाडीतून उतरून टोलनाक्यावरील कर्मचारी यास तुम्ही शिवी देवु नका असे म्हणाला. त्यावेळी त्याने इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन रेड्डी कुटुंबियांना हाताने मारहाण केली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टोल नाकामारहाण

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Next Post
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

ट्रेलर आला, पिक्चर अजूनही बाकी. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी 36 तासात काय काय केलं? लष्कराला पूर्ण सूट

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा