मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सोलापूर शहरात पाकिस्तानचे २५ नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. त्यापैकी ११ नागरिकांचा लाँग टर्म व्हिसा आहे. उर्वरित १४ लोकांना तत्काळ पाकिस्तानमध्ये परत पाठवण्याची गरज आहे.
परंतु ते सिंधी हिंदू धर्माचे लोक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे ग्रामविकास तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. ते शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते.
त्यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पहलगाम येथील दहशतवादी कारवाईनंतर सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
शरद पवार यांच्यावर टीका
काश्मीरमध्ये यापूर्वी झालेल्या हल्ल्यांमध्ये कधीही धर्म विचारला गेला नाही. आताच तो विचारल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती तपासण्याची गरज आहे.
असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर गोरे म्हणाले, ‘अशा स्थितीत प्रश्न उपस्थित करून शंका निर्माण करण्याची पवारांची जुनीच सवय आहे.'(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज