मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात मंद्रूप येथे विद्यार्थ्याने अज्ञात कारणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
बारावीची परीक्षा देणाऱ्या विनायक नागनाथ कुंभार या विद्यार्थ्याने घरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या कोणत्या कारणाने केली, याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आलेलं नाही.
मंद्रूपमधील विनायक नागनाथ कुंभार हा विद्यार्थी लोकसेवा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. बारावी परीक्षेचे आत्तापर्यंत चार पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांने अचानक आत्महत्या केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेची मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप या गावामध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. विनायक नागनाथ कुंभार (वय 17, रा. कुंभार गल्ली मंद्रूप) असं विद्यार्थ्यांचंं नाव आहे. विनायक हा सकाळी उठून अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला.
त्यावेळी घरातील बाथरूममधील खिडकीला टॉवेल बांधून त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. मुलगा बाथरूममधून बाहेर का येत नाही म्हणून वडिलांनी दरवाजा तोडला. त्या विद्यार्थ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तेव्हा त्यांनी तातडीने मुलाने मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच मृत घोषित केलं.
विनायक हा मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी वाणिज्य शाखेत शिकत होता. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत चार पेपर त्यांनी दिले होते.
त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी वडील नागनाथ कुंभार यांनी मंद्रूप पोलिसात खबर दिली आहे. अधिक तपास ग्रेड पोलिस उपनिरीक्षक श्रीमंत जाधव हे करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज