टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात एकूण ८२ हजार ४९२ शेतकरी खातेदार असून आत्तापर्यंत ८३ गावातील १५ हजार ४०० शेतकऱ्यांनी किसान कार्डसाठी नोंदणी केली असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान प्रत्येक शेतकऱ्यांनी महाईसेवा सेंटरवर जावून आपले नाव नोंदवून किसान कार्ड काढावे असे आवाहन तहसिलदार मदन जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक आपत्ती व शासकीय अनुदान वाटप करताना किसान कार्ड असल्याशिवाय रक्कम शेतकऱ्यांना अदा होणार नसल्याचे जाहीर केल्याने आता प्रत्येक शेतकऱ्याला महाईसेवा केंद्रावर जावून शेतकरी नोंदणी करुन किसान कार्ड आवश्यक आहे.
यासाठी संबंधीत व्यक्तीच्या नावे असलेला सात बारा उतारा व आधार कार्ड तसेच आधार कार्डाला लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत असणे गरजेचे आहे.
दि.२६ जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ जाधव यांनी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटून या कार्यक्रमाचा तहसिल कार्यालयात शुभारंभ केला.
सध्या हे काम मसहूल विभागाकडून युध्द पातळीवर सुरु असून तहसिलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल निहाय कॅम्प घेवून किसान कार्ड देण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज