मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
संपत्ती आणि कौटुंबिक वादातून एका कलयुगी मुलानं नोकर आणि त्याच्या मुलाला सुपारी देत स्वतःच्या वडिलांची हत्या केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगा लव आणि नोकराचा मुलगा विशाल यांना अटक केली आहे.
या घटनेत सहभागी असलेला नोकर जितेंद्र अजूनही फरार आहे. नोकर आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. ही धक्कादायक घटना दिल्लीतील नरेला इंडस्ट्रीयल भागात घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लवचा प्रेमविवाह झाला होता, त्यामुळे त्याचे वडील संतापले होते आणि त्याला संपत्तीमधील एकही रुपया न देण्याचं त्यांनी ठरवले.
तसेच संपत्ती दोन्ही बहिणींमध्ये वाटून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याच कारणामुळे मुलाने नोकराला वडिलांची सुपारी देऊन त्यांची हत्या केली.
६७ वर्षीय रमेश भारद्वाज हे आदर्श नगर परिसरात त्यांच्या कुटुंबासह राहत होते. कुटुंबात दोन विवाहित मुली आणि लव्ह नावाचा एक मुलगा आहे. २९ जानेवारी रोजी मृताची मुलगी एकता अरोराने तिच्या वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. मुलीने सांगितले होते की वडील रमेश २८ जानेवारीपासून बेपत्ता होते.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यादरम्यान, रमेशला शेवटचे त्याच्या जुन्या नोकर जितेंद्रसोबत पाहिले गेल्याचे उघड झाले.
यानंतर, जेव्हा पोलिस जितेंद्रच्या घरी पोहोचले तेव्हा तो त्याचा मुलगा विशालसह पळून गेला होता. तपासणीनंतर पोलिसांनी विशालचे स्थान शोधून त्याला अटक केली.
आरोपीने मृतदेह पोत्यात घालून गटारीत फेकले
आरोपी विशालने सांगितले की, रमेश भारद्वाज यांची हत्या त्याचे वडील जितेंद्र यांनी गळा दाबून केली. यानंतर मृतदेह पोत्यात टाकून गटारीत फेकून दिले. पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह गटारीतून बाहेर काढले आणि त्याचा मुलगा लव यालाही अटक केली आहे. जितेंद्र अजूनही फरार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज