मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांची तडकाफडकी सोलापूर येथे बदली झाल्याचा आदेश मंगळवेढा पोलिस स्टेशनला शनिवारी दुपारी प्राप्त झाला.
त्यांच्या जागी सोलापूर दहशतवाद विरोधी शाखा येथून पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे रूजू झाले असून त्यांनी काल दुपारी २.०० वा. आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.
दरम्यान, आपण लोकाभिमुख प्रशासन करण्यास अधिक प्राधान्य देणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.
मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी मागील सहा महिन्यापुर्वी पदभार घेतला होता. दरम्यान, दि. २५ जानेवारी रोजी बोराळे बीट हद्दीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे लाच प्रकरण घडल्याने त्यांच्यावर बदलीची कुऱ्हाड कोसळली आहे.
शनिवारी दुपारी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून ढवाण यांच्या बदलीचा आदेश मंगळवेढा पोलिस प्रशासनास प्राप्त झाला असून त्यांची नेमणूक सोलापूर ग्रामीण कंट्रोल तथा दहशतवाद विरोधी शाखेकडे झाली आहे.
पोलिस निरिक्षक बोरीगिड्डे हे तेथून मंगळवेढयास आले आहेत. ते सन २००५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होवून पोलिस खात्यात दाखल झाले आहेत. ते मूळचे सांगली येथील असून
त्यांनी आत्तापर्यंत मुंबई, वर्धा, धाराशीव, कोल्हापूर येथे आपली सेवा बजावली आहे. पदभार स्विकारताच त्यांनी मंगळवेढा येथील कारागृहाला भेट देवून तेथील सुक्ष्म पाहणी केली.
तसेच मंगळवेढा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची बैठक घेवून कामकाजाबाबत महत्वाच्या सुचना केल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज