मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवार सायकल क्लबकडून मात्र अगोदरच मंगळवेढा मरवडे,हुलजंती या मार्गांवर सायकल राईड काढून रस्ता सुरक्षा प्रबोधन जनजागृती करण्यात आली.
सुरवातीस दामाजी चौकात पोलीस स्टेशच्या वतीने पोलीस सहाय्यक नागेश बनकर व विजय पिसे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या मंगळवेढा-हुलजंती मार्गांवर साखर कारखाने असून रात्री, पहाटे ट्रॅक्टर, ट्रकने ऊस वाहतूक मोठया प्रमाणवर सुरु असते तसेच कर्नाटक राज्यात जाणारी अवजड वाहतूक कायम सुरु असते
यामुळे टू-व्हीलर,फोर-व्हीलरचे अपघात होत असतात यासाठी वाहतुकीचे नियम नागरिकांनी पाळावेत व रस्त्यावरचे होणारे अपघात टाळावेत,रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने सदर राईडचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गतीला आवरा जीवाला सावरा,जो चुकला नियमाला तो मुकला जीवनाला,
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, वाहतुकीचे नियम पाळा रस्त्यावरचे अपघात टाळा,अती घाई संकटात न्हेई अशा घोषणा देऊन गावात जागृतीपर पत्रके वाटण्यात आली ऊसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर वाल्यांनी मागील बाजूस लाल दिवा किंवा रेट्रो रिफ्लेक्टिव्ह लावावेत,
दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करावा,वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात व मद्यप्राशन करून वाहन चालवू नये,वाहन चालविताना लेन कटिंग करू नये,मोबाइल फोनचा वापर करू नये,दारू पिऊन वाहन चालवू नये तसेच
चुकीच्या बाजूने वाहन चालवू नये,वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये असा प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला आपल्या देशातील रस्ते चकचकीत झाले असले तरी रस्त्यावरील अपघात कमी झाले नाहीत
अशी खंत काही दिवसापूर्वीच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत व्यक्त करुन त्यासाठी लोकांचे प्रबोधन जनजागृती करणे आवश्यक आहे असे सांगताच मंगळवेढ्याच्या वारी परिवार सायकल क्लबने मात्र लगेचच हाती घेतलेले रस्ता सुरक्षा जनजागृतीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
यावेळी धन्यकुमार पाटील,संतोष जामदार,बिराप्पा होनमुरे,अनिल मासाळ, तानाजी सोनवणे, म्हाळाप्पा कुळवे, मुकेश कनशेट्टी, दत्ता शेजाळ, मल्लू माळी यांनी स्वागत केले रस्ता सुरक्षा सायकल राईडमध्ये प्रा महेश आलिगावे,जयंत पवार,प्रकाश मुळीक,प्रफुल्ल सोमदळे,अरुण गुंगे,गणेश मोरे, राजाभाऊ गणेशकर,पांडुरंग नागणे,ओम नागणे,स्वप्नील टेकाळे,सचिन घुले,सिद्धेश्वर डोंगरे, रतिलाल दत्तू,प्रा विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू आदिनीं महालिंगरायाचे दर्शन घेऊन प्रबोधन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज