मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
माळीन (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने मुलांना मिरची खाऊ घातल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
यामुळे माळीण गावातील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. विद्यार्थी व शिक्षक यामध्ये एक जिव्हाळ्याचं नातं असतं. मात्र, त्या नात्याला या ठिकाणी वेगळेच वळण लागले आहे.
माळीण येथील विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिवसांपासून घबराटीचे वातावरण होते मुले शाळेत जायला तयार नव्हती. त्यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन विचारले
असता, आम्हाला सदर शिक्षक हा मारहाण करतो, आम्हाला तिखट मिरची खायला घालतो. यामुळे आम्ही शाळेत जाणार नाही, असे मुलांनी सांगितल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
या शिक्षकाविरोधात पालकांनी गटशिक्षण अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. माळीण (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद शाळा ही पहिली ते सातवीर्यंत शाळा आहे.
शाळेतील राहुल हिरवे सर हे आम्हाला मारहाण करतात तसेच वेळोवेळी मिरची खाऊ घालतात असे मुले सांगत आहेत. तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ सदर शिक्षकाविरोधात कार्यवाही करून सदर शिक्षकाची बदली करावी, अशी मागणी केली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7588214814
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588214814 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज