मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढ्यात एक भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटे 1.17 च्या सुमारास मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील वीरशैव मंगल कार्यालय समोर घडली आहे.
उमेश अशोक आवताडे (वय 39 रा.मंगळवेढा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दौलतराया लिंगाप्पा तळवार हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याची खबर पोलीस कर्मचारी कृष्णा जाधव यांनी दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.20 डिसेंबर रोजी नाईट राउंडचे अमंलदार पोना बनकर यांनी फोन करुन मंगळवेढा ते पंढरपुर जाणारे रोडवरील विरशैव मंगल कार्यालयाचे समोर रोडवर एक ट्रॅक्टर व स्वीफ्ट कारचा अपघात झालेबाबत सांगितलेने सदरा ठिकाणी गेले असता
तेथे ट्रॅक्टरचा नंबर MH 45 AL 6915 व स्विफ्ट कार नंबर MH 12 GK 3825 यांचा अपघात झाला होता. सदर ट्रॅक्टरचा चालक हा निघुन गेलेला होता.
स्विफ्ट कार जवळ जावुन पाहिले असता तिचा नंबर MH 12 GK 3825 असा होता. त्या स्विफ्ट कारमध्ये मंगळवेढा पोलीस ठाणेस नेमणुकीस असलेले पोहेकॉ दौलतराया लिंगाप्पा तळवार व त्यांचेसोबत अनोळखी इसम होता.
झालेल्या अपघातात पोहेकॉ 1439 तळवार यांचे पायास, डोक्यास, पोटास, हनुवटीवर मार लागलेला होता व अनोळखी इसमाचे डोक्यास, शरिरास गंभीर जखमा झालेल्या होत्या. तो कारमध्ये अडकलेला होता.
त्यानंतर चेकिंग अंमलदार पोहेकॉ 1461 मोरे यांना मदतीकरीता बोलावुन रस्त्याने येणारे जाणारे लोंकाचे मदतीने पोहेकॉ 1439 तळवार यांना पंढरपुर येथे पाठविले.
अनोळखी इसमास ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे पाठिवले असता तो उपचारापुर्वीच मयत झालेचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे असे दिलेल्या खबर मध्ये म्हंटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीमंत पवार हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7588214814
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588214814 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज