मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
यंदाच्या हिवाळ्यात थंडी नव-नवे विक्रम करत असताना सोमवार, १६ डिसेंबर रोजी मोसमातील सर्वात कमी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमी झालेल्या तापमानामुळे जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा, खाली येताना दिसत आहे.
उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सोलापूरसह राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. मागील चार दिवसांपासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळे किमान तापमानात झपाट्याने घट झाली.
कमी तापमानाची नोंद झाल्याने नागरिक कुडकुडत आहेत. ठिकठिकाणी शेकोटीच्या उबेला नागरिक बसल्याचे चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहत आहे.
सध्या शहर व जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली असून पहाटेच्या वेळी अंगाला झोंबणारा गारवा जाणवत आहे. तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे यंदा तापमान रेकॉर्ड मोडणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात २० डिसेंबरपर्यंत संपूर्ण गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
त्यानंतर मात्र राज्याच्या तुरळक भागांमध्ये हलक्या सरी तसेच ढगाळ हवामान असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा परिणाम तापमानावरही होऊ शकतो.
थंडीच्या लाटेचा परिणाम
शेजारील पुणे, अहिल्यादेवी नगर, बीड आदी जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यावरही झाला असून जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. सोमवार, १६ डिसेंबर रोजी ११.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्याला थंडीच्या लाटेच्या इशारा दिला नसला तरी थंडीची लाट आल्याचा अनुभव सोलापूरकरांना येत आहे.
हुडहुडी थंडी, कडक ऊन.. आजोबा, चिमुकल्यांना जपा
रात्रीच्या वेळी जीवघेणा बोचरी थंडी, तर दिवसा कडक ऊन आशा बदलत्या वातावरणामुळे अक्कलकोट शहर व तालुक्यात सर्दी, खोखला, थंडी, ताप, दमा, आशा विविध प्रकारचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यामुळे ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखाना सर्वत्र हाऊसफुल्ल झालेले आहेत. मागील आठ दिवसांत केवळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण संख्या तब्बल ३ हजार ३८० इतकी झाली आहे.
सर्दी-खोकला अन् तापाचे सर्वाधिक रुग्ण
एकूण रुग्णसंख्या ३,३८० आहेत. त्यामध्ये अस्थमा, दमा रुग्णसंख्या २०, सर्दी, खोकला रुग्णसंख्या ७००, थंडी, ताप रुग्णसंख्या ७५०, असे आदी प्रकारचे मिळून तब्बल ३,३८० रुग्णाची तपासणी, उपचार केवळ सात दिवसांत ग्रामीण रुग्णालयात नोंद झाली आहे.
या व्यतिरिक्त आठ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खासगी रुग्णालय याचे आकडेवारी वेगळे आहेत. एकंदरीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर आरोग्य यंत्रणा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज