मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शेतीवरील बोजा कमी करण्याचे बनावट लेटरपॅड तयार करून स्वामी विवेकानंद पतसंस्थेची ५ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सदानंद मनोहर भोसले (रा. चपळगाव,ता. अक्कलकोट) या शेतकऱ्याविरुद्ध
फसवणुकीचा गुन्हा अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात नोंदला आहे. हा प्रकार १६ एप्रिल २०१८ रोजी घडला. ही बाब संस्थेच्या निदर्शनास येताच शुक्रवारी गुन्हा नोंदवण्यात आला.
याप्रकरणी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सिद्रामप्पा दसले (वय ४३, रा. लोकमंगल विहार, बासलेगाव रोड अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील गुन्हा दाखल झालेला सदानंद भोसले याने संस्थेचे कर्ज घेतले होते. सातबारावरील बोजा कमी करण्यासाठी त्याने संस्थेच्या लेटरपॅडचा गैरवापर करून
बनावट सही, शिक्का तयार करून शेतावरील ५ लाख ४१ हजार रुपये परतफेड केल्याचे दाखवून संस्थेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने त्याने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि नीलेश बागव करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज