टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह ३२ संचालक, दोन अधिकारी व एक चार्टड अकाउंटंट अशा बेकायदेशीर कर्जप्रकरणी जबाबदार धरलेल्या ३५ लोकांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीसमध्ये दिलेली रक्कम व्याजासह १५ दिवसांत भरावी, असे म्हटले आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्ज वाटप प्रकरणाची चौकशी २०११ पासून सुरू आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कर्जवाटपाची चौकशी पूर्ण झाली आहे.
कलम ७८, कलम ८३ व कलम ८८ अन्वये चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. सहकार खात्याचे अपर निबंधक किशोर तोष्णीवाल यांनी ८८ अन्वये चौकशी करून बेकायदेशीर कर्जवाटपाला ३२ संचालक, दोन अधिकारी व एक चार्टड अकाउंटंट अशा ३५ लोकांना जबाबदार धरले आहे.
२००९ ते २०१४ या कालावधीत वाटप केलेल्या २३८ कोटी ४३ लाख ९९९ हजार रुपये इतक्या कर्जाला जबाबदार धरण्यात आले आहे. ८८ चे आदेश मिळताच कलम ९८ अन्वये विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला वसुलीचे आदेश दिले आहेत.
विभागीय सहनिबंधकांनी चौकशीत ८८ अन्वये निश्चित केलेल्या रकमेचा उल्लेख करीत नोटीसची प्रत जबाबदार धरलेल्या ३५ लोकांना दिली आहे. विभागीय सहनिबंधक सुर्वे यांच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वसुली अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी जबाबदार धरलेली रक्कम १२ टक्के व्याजासह १५ दिवसांत भरावी असे प्रत्येकाला म्हटले आहे.
या ३५ जबाबदारांना बजावली नोटीस
चांगोजीराव देशमुख, भाई एस.एम. पाटील, दिलीपराव सोपल, विजयसिंह मोहिते-पाटील, दीपकराव साळुंखे-पाटील, सुधाकरपंत परिचारक, प्रतापसिंह मोहिते-पाटील, राजन पाटील, चंद्रकांत देशमुख, जयवंतराव जगताप, रणजितसिंह मोहिते-पाटील, रामचंद्र वाघमारे, सिद्रामप्पा पाटील, सुरेश हसापुरे, दिलीप माने, संजय शिंदे, बबनराव शिंदे,
बबनराव अवताडे, राजशेखर शिवदारे, अरुण कापसे, संजय कांबळे, बहिरू वाघमारे, सुनील सातपुते, रामदास हक्के, चांगदेव अभिवंत, भर्तरीनाथ अभंग, विद्या बाबर, सुनंदा बाबर, रश्मी दिगंबरराव बागल, नलिनी चंदेले, सुरेखा ताटे, सुनीता बागल हे संचालक, तर बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे, के. आर. पाटील, चार्टट अकाउंटंट संजय कोठाडिया आदी. यातील मृत संचालकांच्या वारसांना नोटीस बजावण्यात आली आहे.
वसुलीचे अधिकार आहेत म्हणून…
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या १५६ अन्वये आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ च्या नियम १०७ निबंधक अंतर्गत भू-राजस्व थकबाकीप्रमाणे जबाबदारीच्या एकत्रित रकमांची वसुली करण्याचे अधिकार आहेत. अधिकृत अधिकाऱ्यांनी जबाबदार धरलेली २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपये १२ टक्के व्याजासह भरण्यास नोटीसमध्ये म्हटले आहे.
हे आहेत मृत संचालक
चांगोजीराव देशमुख, भाई एस.एम.पाटील, सुधाकरपंत परिचारक, प्रतापसिंह मोहिते- पाटील, रामचंद्र वाघमोडे, संजय कांबळे, चांगदेव अभिवंत हे मृत संचालक असल्याने त्यांच्या वारसाकडून वसुलीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज