टीम मंगळवेढा टाइम्स ।
बँकेतून पैसे काढलेल्या एका उद्योजकावर लक्ष ठेवून चार चोरांनी शंभरच्या पाच नोटा जमिनीवर टाकून साडे सात लाख रुपये पळविल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पंढरपुरातील सरगम चौक येथील एचडीएफसी बँकेसमोर घडली.
नवनाथ मच्छिंद्र बाबर (वय ४३, रा.वाखरी, ता. पंढरपूर) हे एचडीएफसी बँकेतून ७ लाख ५० हजार रुपये कामानिमित्त काढून घेऊन एका पिशवीत भरून बँकेबाहेर त्यांच्या गाडीजवळ आले.
बाबर त्यांच्या गाडीवर बसताच त्यांच्या पाठीमागून दोन अनोळखी व्यक्ती आल्या. ‘अहो, तुमच्या पाठीमागील बाजूस पैसे पडले आहेत,’ असे ते म्हणाले. त्यावेळी बाबर यांना शंभर रुपयांच्या चार-पाच नोटा रोडवर पडल्याचे दिसून आले.
पँटच्या खिशातून चावी काढताना त्या नोटा पडल्या असतील, असे बाबर यांना वाटले. त्यामुळे साडेसात लाख रुपये असलेली पिशवी स्कूटीच्या मध्यभागी खाली बाजूस ठेवून बाबर स्कूटीवरून खाली उतरून पैसे गोळा करू लागले.
त्यादरम्यान पैसे पडले, असे सांगणाऱ्या दोन व्यक्तींजवळ आणखी दोघे जण मोटारसायकलवर बसलेले होते. बाबर खाली पडलेल्या नोटा गोळा करीत असतानाच त्यांची गाडीवर ठेवलेली पैशांची पिशवी पटकन उचलून एकाने त्यांच्या मागे उभे असलेल्या मोटारसायकलवरील लोकांना दिली.
ती पिशवी घेऊन ते रेल्वे पुलाच्या खालील बाजूस जोराने निघून गेले. त्यानंतर बाबर यांनी मोठ्याने आरडाओरडा केला; परंतु, भरधाव वेगाने ते निघून गेले. याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चार चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज