टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे तब्बल 8 हजार 316 मतांनी विजयी विजयी झाले आहेत. पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान अवताडे विजयी झाले होते. अशाप्रकारे काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान आवताडे यांच्यासमोर दुसऱ्यांदा पराभव झाला आहेत.
लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला : एकनाथ शिंदे
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. शिंदेंनी विजयानंतर मतदारांचे आभार मानत तसेच लाडकी बहिण योजनेचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : महाराष्ट्राच्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिलं – अजित पवार
महाराष्ट्राच्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिलं. राज्य कंगाल केलं अशी आमच्यावर टीका झाली.लोकसभेत आम्हाला अपयश मिळालं. आम्ही ते मान्य केलो, त्यातून शिकलो, सावरलो.
लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. विरोधक उताणे पडले. विजयानंतर अजित पवारांनी मानले जनतेचे आभार.
वानखेडे स्टेडियमवर होणार नव्या सरकारचा शपथविधी
वानखेडे स्टेडियमवर होणार नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. सोमवारी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी पार पडणार आहे. याआधी 2014 सालीही याच वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा पाकर पडला होता. जनतेने दिलेला कौल मान्य, संजय काका पाटील यांची प्रतिक्रिया
जनतेने दिलेला कौल मान्य करायचा, विकासाचा जो प्रयत्न केला,पण भावनेवर राजकारण केलं गेलं,त्यामुळे आपल्याला अपयश आलं, अशी प्रतिक्रिया सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पराभूत उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहन करत राज्यात आणि देशात महायुतीचे सरकार आहे,त्यामुळे विकासाचा राजकारण यापुढे करूया,असं मत देखील संजयकाका पाटील यांनी व्यक्त केलं.ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते.
पंढरपूर विधानसभा मतमोजणी महत्वाचे !
मतमोजणीत काहीही गैरप्रकार नाही, फेर मतमोजणीचा अर्ज आला होता, फेटाळला आहे, मतदानाची अंतिम बेरीज बरोबर आहे, तफावत नाही, असा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खुलासा केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज