टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक आचारसंहितेनुसार आयोगाच्या सांगोला तालुक्यातील सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारात कामात प्रत्यक्ष
वा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्याविरुद्ध विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंग विषयक कठोर कारवाई करावी असे पत्रक संबंधित संस्थांना पारित केल्याचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.
राज्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोग यांचेकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे विविध प्रकारचे निर्देश दिले आहेत.
शासन निर्णय दि.२० मे २०१० अन्वये राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी समाईक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदी लागू केल्या आहेत.
नियम -१९०९ मधील नियम ५ (१) मध्ये नमूद केल्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचे सदस्य होता येणार नाही किंवा त्यांच्याशी संबंध ठेवता येणार नाही.
कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात भाग घेता येणार नाही सहाय करता येणार नाही तसेच ५ (४) नुसार तो कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत प्रचार करू शकणार नाही अगर हस्तक्षेप करु शकणार नाही त्यासंबंधी आपले वजन खर्च करू शकणार नाही, त्यात भाग घेऊ शकणार नाही. असे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी स्पष्ट केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज