टीम मंगळवेढा टाईम्स।
धनगर समाजाचे आराध्य दैवत महालिंगराया व बिरोबा या गुरु-शिष्य भेटीचा सोहळा शुक्रवार दि.१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास हुलजंतीयेथील मंदिराच्या लगत असणाऱ्या ओढ्यात होणार आहे. भंडाऱ्यांची उधळण करत कर्नाटक, आंधप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातील लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.
या सोहळ्याचे वैशिठे म्हणजे अमावसाच्या रात्री स्वतः शंकर पार्वती है महालिंगराया मंदिराच्या कलसाला मुंडास गुंडाळून जातात. अशी भाविकांची श्रध्दा आहे, त्याला ध्वज असे म्हंटले जाते.
गुरुवार दि. ३१ ऑक्टोंबर रोजी रात्री ध्वज लागणार असून, शुक्रवारी दुपारी पालखी भेट होणार आहे. हुन्नूरचा बिरोबा वहुलजंतीचा महालिंगराया यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक हजेरी लावतात.
चडचण, सोनी, मंगळवेढा मार्गावर वाहने व भाविकांची मोठी गर्दी असते. महालिंगराया मंदिरात यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, अग्निशामक वाहन वैद्यकीय पथक, फिरते शौचालय, २४ तास वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून तसेच दक्षतेसाठी यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून, मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
देणगी पेटीवरुन वादाची शक्यता
देवस्थान समितीत वाद असल्याने परस्पर गट न्यायालयात गेल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार यात्रेतील सर्व विधी व सेवा तहसीलदार मदन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडावे असा आदेश आहे, यंदा यात्रेसाठी प्रभारी महसूल नायब तहसीलदार श्रीमती सुरेखा हजारे यांची कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे, तरी देखील या ठिकाणी देणगीच्या पेटीवरून दोन गटात वाद होण्याची शक्यता आहे.
भेटीच्या ठिकाणी घाट बांधण्याची गरज
यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे ज्या ठिकाणी पालखी भेट होते त्याठिकाणी बंधाऱ्यामुळे पाणी आहे, त्यामुळे ओढ्याच्या लगतच्या बाजूला चिखलात भाविकांना उभारावे लागते, पालखी भेट होते, त्याठिकाणच्या परिसरातील जमीन अधिग्रहण करून विकसित होणे, तसेच या परिसरात घाट बांधणे आवश्यक आहे. कर्नाटकातील वाहनांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे.
आठ पालख्यांची भेट
हुन्नुरचा बिरोबा, २ सोन्याळचा विठोबा, ३ उटगीचा ब्रम्हदेव, ४ जिराअंकलगीचा बिर्राप्पा, ५ शिराढोणची शिलवंती, ६ हुलजंतीचा महालिंगराया, ७ शिराढोणचा बिरोबा ८ महालिंगरायाचा नातू कसगी येथील बगलीसिध्द या पालख्यांची भेट होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज