टीम मंगळवेढा टाईम्स ।
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही.
यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय चित्र काय?
2019 मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेच्या 40 आमदारांसह पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत बंड करत महायुतीत सहभागी झाले. यानंतर या दोघांनीही थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. यामुळे राज्याच्या राजकारणाला हादरे बसले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज