टीम मंगळवेढा टाईम्स ।
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन राज्यात एक लाख, तर सोलापूर जिल्ह्यात १० हजार उद्योजक तयार झाले. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेमुळे नव्या उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे.
येत्या काळात महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात एक हजार मराठा उद्योजक तयार झाले व्हावेत. त्यांच्या माध्यमातून समाजाची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक लाख मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली आहे. या संकल्प पूर्तीनिमित्त महामंडळ तसेच लोकमंगल बँक, पंढरपूर अर्बन बँक, निशिगंधा बँक व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने येथील श्रीयश पॅलेसमध्ये मराठा उद्योजक जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा घेण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. मेळाव्यास आमदार समाधान आवताडे, अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश साठे, भाजपाचे युवक नेते प्रणव परिचारक, उमेश विरधे,
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, विजयसिंह देशमुख, सुमित शिंदे, तालुकाध्यक्ष सचिन डोरले आदीसह बँकांचे अधिकारी, पदाधिकारी, मराठा उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी महामंडळाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना सहकार्य केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात अनेक मराठा उद्योजक उभे राहिले आहेत. यापुढील काळातही ग्रामीण भागातील मराठा तरुणांनी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन गावातच वेगवेगळे उद्योग, व्यवसाय सुरू करावेत.
आ. समाधान आवताडे म्हणाले, पंढरपुरात महामंडळाचे उपकेंद्र झाल्यामुळे या परिसरातील मराठा तरुणांना अधिक चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे. जास्तीत-जास्त तरुण – तरूणींनी या योजनेचा लाभ घ्यावा.
त्याचा परतावाही वेळेत करावा. यावेळी यशस्वी उद्योजक व लाभार्थी रोहित पवार यांनी अनुभव कथन केले. तसेच अर्जुन चव्हाण, प्रणव परिचारक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी योजनेचे लाभार्थी तसेच बँकांच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पंढरपुरात महामंडळाचे उपकेंद्र
पंढरपूर येथे महामंडळाच्या उपकेंद्राचे उद्घाटनही अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उपकेंद्राचा सांगोला, मंगळवेढा, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील समाज बांधवांची सोय होणार असून जास्तीत-जास्त मराठा तरुण – तरूणीनी याचा लाभ घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज