टीम मंगळवेढा टाईम्स ।
ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात. सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पाहत असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक, या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे.
महागाई, संघटनांनी केलेल्या मागणीचा व वाढलेल्या कामांचा विचार करून शासनाने सरपंच व उपसरपंचाचे मानधन वाढविण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला आहे. याचा फायदा जिल्ह्यातील ११४४ सरंपच व उपसरपंचांना होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सरपंच संघटना, लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व काळाच्या ओघात महागाई निर्देशकांत झालेली वाढ,
कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन तसेच सरपंच संघटनांच्या आझाद मैदान येथील आंदोलनकर्त्यांना मंत्री यांनी सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली. त्याअंतर्गत गावातील प्रशासकीय अधिकार सरपंचाकडे आले. सरपंचाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो; पण गैरवर्तवणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून हटवता येऊ शकते.
७५ टक्के शासनाचा… २५ टक्के खर्च ग्रामपंचायतीचा सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी ७५ टक्के रक्कम शासन देणार असून उर्वरित २५ टक्के मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून करणार आहे. ही वाढ २४ सप्टेंबर २०२४ पासून लागू असणार आहे.
स्वागतार्ह निर्णय
राज्य शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला हा स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र सदस्यांच्या बैठक भत्यात वाढ करणे अपेक्षित होते.
शासनाने पुढील कॅबेनेट बैठकीत सदस्यांचा बैठक भत्त्यात देखील दुप्पट वाढ करुन त्यांचा बैठक भत्ता ऑनलाईन खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत पदाधिकारी सह सदस्य देखील लाडके करावेत. -कविता घोडके-पाटील, महिला जिल्हाध्यक्षा, सरपंच परिषद
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज