टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट मिळणार आहे. पंतप्रधानांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त ओडिशातील महिलांना सुभद्रा योजना नावाच्या एका मोठ्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा मो-सेवा केंद्र आणि जनसेवा केंद्रातून फॉर्म मिळवावा लागेल.
यासाठी महिलांना वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. पूर्ण केलेला फॉर्म संबंधित कागदपत्रांसह अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जमा करावा लागेल.
10 हजार रुपये थेट खात्यात येतील
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ओडिशा सरकारने राज्यातील महिलांसाठी सुभद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना वर्षाला १० हजार रुपये दिले जातील. ओडिशा सरकारच्या माहितीनुसार, राज्यातील अंदाजे एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी सरकारने यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. 17 सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकार ही योजना सुरू करणार आहे. या योजनेत महिलांना प्रत्येकी 5,000 रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये एका वर्षात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवले जावेत.
कोणत्या महिला पात्र असतील
सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी महिलांनी ओडिशा राज्यातील मूळ रहिवासी असणेही आवश्यक आहे. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाभ दिला जाणार नाही किंवा ज्या महिलांच्या घरात आयकरदाते आहेत,
त्यांनाही या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सधन महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत आणि ज्या महिला राज्याच्या कोणत्याही योजनेंतर्गत आधीच ₹ 1500 चा लाभ घेत आहेत. त्यांना सुभद्रा योजनेंतर्गत लाभही दिला जाणार नाही.
काय आहे योजना?
ओडिशा सरकारची सुभद्रा योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील 21 ते 60 वर्ष वय असलेल्या महिलांना दरवर्षी 10,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केली. योजनेला नाव भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरुन देण्यात आलेलं आहे.
पात्रता कोणती?
लाभार्थी महिला मूळची ओडिशा राज्याची रहिवाशी असावी.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) किंवा राज्य अन्न सुरक्षा योजना (SFSS) मध्ये या महिलेचे नाव शिधापत्रिकेत असावं.
एकूण कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय 21-60 वर्षे असावे.
कसा करावा अर्ज
सुभद्रा योजनेच्या पात्र महिला ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी त्यांना सुभद्रा पोर्टलचा वापर करावा लागेल. तर ऑफलाइन अर्जासाठी ते स्थानिक बँका, पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रांमध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.
कोणती कागदपत्रे आवश्क?
आधार कार्ड – ओळख पडताळणीसाठी
पासपोर्ट आकाराचा फोटो
जन्म प्रमाणपत्र – अर्जदाराच्या वयाची पुष्टी करण्यासाठी
बँक खाते तपशील – पैसे हस्तांतरित करण्यासाठी.
पत्त्याचा पुरावा – ओडिशातील अर्जदाराच्या निवासस्थानाची पुष्टी करण्यासाठी.
जात प्रमाणपत्र – लागू असल्यास, सामाजिक श्रेणीचे तपशील प्रदान करण्यासाठी.
रहिवासी पुरावा – ओडिशातील निवासाची पडताळणी करण्यासाठी
मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज