टीम मंगळवेढा टाईम्स ।
सद्यःस्थितीला दुग्ध व्यवसाय शाश्वत करायचा असेल तर सर्वांत महत्त्वाचे गायींचे संतुलित आहार व्यवस्थापन आहे. गायीच्या वाढीसाठी, दूध उत्पादन आणि चांगल्या प्रतीसाठी, तसेच एकूणच गायीचे आरोग्य उत्तम ठेवून चांगले प्रजनन होण्यासाठी गायीच्या आहारात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवनसत्त्वे यांचा संतुलित वापर होणे महत्त्वाचे असते.
मुक्त गोठ्यामध्ये जोपासलेल्या कालवडीचा वाढीचा दर, वाढीच्या काळात जोपसण्याचा खर्च, दुभत्या गाई, म्हशींचे दूध उत्पादन व दुधाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा दिसून येते. बंदिस्त गोठ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या टाळण्याकरिता मुक्त हवेशीर गोठा हा चांगला पर्याय आहे.
दुग्ध व्यवसायात उत्पादन खर्च कमी करून दूध उत्पादन वाढविण्यासाठी गायीचा संतुलित आहार महत्त्वाचा आहे. तसेच जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी गोचीड मुक्त गोठा व मुक्त संचार गोठा आवश्यक असल्याचे मत विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे संचालक डॉ.अनिल भिकाने यांनी व्यक्त केले.
माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) विठ्ठल इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई रिसॉर्ट येथे रक्तदान शिबिर आणि पशुपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाफा फिड्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर हेमंत घोडके व जाफा फिड्सच्या डॉ. मयुरी मिसाळ यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, वनअधिकारी माणिक भोसले, अरविंद केदार, युवासेनेचे तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, प्रविस कृषी रासायनिकचे कार्यकारी संचालक हणमंत भोसले,
पालवी ऍग्रोचे कार्यकारी संचालक राहुल जाधव, तानाजी पवार, प्रगतशील शेतकरी नामदेव सिद, कोंडीबा सिद, विश्वनाथ चव्हाण, राहुल जाधव, चेअरमन अरुण सुरवसे, अंकुश लिगाडे, सचिन इंगोले, पोपट केदार, अशोक भाटेकर, व्हा.चेअरमन सुखदेव रंदवे,
विवेक घाडगे, विक्रम घाडगे, प्रताप घाडगे, दत्तात्रय घाडगे, उपसरपंच उदयसिंह घाडगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत फुले, कैलास आवताडे, विक्री अधिकारी कुणाल गांगुर्डे, डॉ.दत्तात्रय इंगोले, महादेव शिंदे, माणगंगा डेअरी इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर राहुल सोलापूरकर,
माणगंगा परिवार अर्बन बँकेचे सीईओ अक्षय मुढे, प्रशांत पठ्ठा, कृषी सहाय्यक बाळासाहेब सावंत, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील, समीर पाटील, इंजी.मधुकर कांबळे, इंजी संतोष भोसले, मच्छिंद्र सोनलकर, वैजीनाथ घोंगडे,
युवा नेते यशराजे साळुंखे पाटील, समीर पाटील, विजय वाघमोडे यांच्यासह शैक्षणिक, राजकीय, कृषी, सामाजिक, पत्रकार आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) विठ्ठल इंगोले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शुभेच्छा दिल्या. रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणगंगा परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य
सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य करून उद्योजक तयार करण्यासाठी नितीन इंगोले यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. तसेच दुग्ध व्यवसाय वाढीस लागण्यासाठी पशुपालकांचा मेळावा आयोजित केल्याने शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन मिळाले आहे.
माणगंगा उद्योग समूहातील सर्वच उद्योगांची भरभराट व्हावी आणि नितीन इंगोले यांना उदंड आयुष्य लाभावे अशा शुभेच्छा आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिल्या.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज