टीम मंगळवेढा टाईम्स ।
शासन प्रत्येक तालुक्याला जिल्हा मार्ग, नॅशनल हायवेसह विविध विकासकामांसाठी प्रत्येक वर्षी निधी देत असते. मात्र, सध्या मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात माझ्यामुळेच निधी आणला असे काही जण भासवत आहेत.
जर मतदारसंघात तीन हजार कोटी आले असते, तर साड्या वाटायची वेळ आमदारांवर आली नसती, हे दुर्दैव आहे.
निवडणुकीच्या मतांसाठी कोणत्या थराला जायचे याचे संकेत पायदळी तुडवण्याचे काम सुरू असल्याची टीका माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.
मारोळी (ता मंगळवेढा) येथे भोसे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.
परिचारक पुढे म्हणाले, विधानसभा पोटनिवडणुकीत ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले ज्यांनी त्यांना आमदार केले. त्यांना मदत करणे सोडाच त्यांना पोलिसांचा वापर करून जेलमध्ये टाकण्याचे उद्योग झाले.
माझ्या घरी ३० ते ३५ वर्षे आमदारकी होती; पण आम्ही कधीही याला उचला, याला आत टाका असले उद्योग केले नाहीत. मंगळवेढ्याची जनता सहनशील असली तरी स्वाभिमानी असून, योग्य वेळी हिशोब चुकता करते, हा इतिहास आहे.
यावेळी दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, इनूस शेख, काशीनाथ पाटील, संचालक औदुंबर वाडदेकर, गौरीशंकर बुरकुल, राजेंद्र पाटील, महादेव लुगडे, दिगंबर भाकरे, सुनील लोखंडे रेड्डेकर, सरपंच राजकुमार पाटील, विठ्ठल बिराजदार, रामभाऊ माळी, नामदेव जानकर, रणजित जगताप, एकनाथ होळकर, कांतीलाल ताटे आदी उपस्थित होते.
थोड्यात काळात त्यांना अहंकार चढला
राजकारणात थोड्या काळात काहींना अहंकार येतो. मीपणा येतो, मात्र, या भूमीत ज्यांना ज्यांना अहंकार चढला त्याचा पाडाव झाला आहे. ही निवडणूक कोणाला पाडण्यासाठी नाही तर गेल्या तीन साडेतीन वर्षात ज्या भूमिकेने एकत्र आलो, त्याला मोठा तडा गेला आहे.
निवडणुकीपूर्वी तरी चर्चा होईल असे वाटले होते. मात्र, दुर्दैवाने हे झाले नाही. कारण अहंकार आहे. दामाजी कारखान्यास १०० कोटींची शासनाची मदत मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. अनेक मांजरं आडवी गेली; पण फडणवीस त्यांना जुमानले नाहीत, असेही ते म्हणाले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज