mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप; ‘या’ पक्षातील व गटातील दिग्गज नेते तुतारी हाती धरण्याच्या तयारीत?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 28, 2024
in मंगळवेढा, राजकारण, राज्य, सोलापूर
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभेचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये राजकीय घटनांना वेग आला असून विधानसभा निवडणूकीपूर्वी सोलपुरात भाजप आणि अजितदादा गटातील दिग्गज नेते हातात तुतारी धरण्याच्या तयारीत आहेत.

लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभवामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा महाआघाडीने जिंकल्या होत्या.

यामुळे आता विधानसभेला महायुतीतील अनेक विद्यमान आमदार व दिग्गज नेते हे महायुतीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसून या नेत्यांची शरद पवार यांच्याकडे तिकीट मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला आणि प्रामुख्याने भाजपाला बसणार याची जाणीव असल्याने अनेक नेते जरांगे यांची एकाबाजूला भेट घेत असून दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत .

पंढरपूर मंगळवेढ्यात काय स्थिती?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे हे आमदार असून आता या ठिकाणी माजी आमदार प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवू इच्छितात यासाठी परिचारक हे शरद पवार यांच्या संपर्कात असून विधानसभेला तुतारी घेऊन निवडणूक लढवू शकतात.

प्रशांत परिचारक हे पूर्वाश्रमीचे शरद पवार गटाचे असून पुन्हा ते स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.

भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याची भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी सावंत यांना कामाला लागा असे आदेश दिले आहेत.

पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा साधना भोसले यादेखील परिचारक गटाच्या म्हणून ओळखल्या जातात त्यांनीही दोन दिवसापूर्वी जयंत पाटील यांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा साठी उमेदवारीची मागणी केली आहे.

भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे. याच पद्धतीने लोकसभा निवडणूक काळात विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजीत पाटील हेदेखील विधानसभेला भाजपला सोडचिठ्ठी देत

माढा किंवा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेल्यावर अभिजीत पाटील यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत शरद पवार यांना साथ दिली होती. मात्र त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना भाजपकडे जावे लागले होते.

सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीला अनेक धक्के पचवावे लागणार

सांगोल्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे हेही या वेळेला शिवसेना आमदार शहाजी बापू यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे मात्र महायुतीची ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने दीपक साळुंखे ही शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण मतदार संघात यावेळी शरद पवार यांची तुतारी हाती घेण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज प्रयत्न करीत असल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी विधानसभेपूर्वी अनेक धक्के पचवावे लागणार आहेत.

करमाळ्यात महायुतीला धक्का?

करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष असले तरी अजित पवार यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात या विधानसभेलाही संजय शिंदे हे महायुतीतून न लढता पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याने महायुतीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

माढ्याचे विद्यमान ज्येष्ठ आमदार बबन दादा शिंदे हे देखील अजित पवार गटाला रामराम करून पुन्हा शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यासाठी आमदार शिंदे यांनी आपला मुलगा रणजीत सिंह शिंदे यांच्यासह अनेक वेळा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे.

शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास आमदार शिंदे यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. माढ्यातूनच आमदार शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदेहेही चुलत्याच्या विरोधात बंड करून उमेदवारी मागत आहेत.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शरद पवार

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
Next Post
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

मोठी बातमी! महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची ऑफर; आमदार समाधान आवताडे यांच्या दाव्याने मतदारसंघात खळबळ

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा