टीम मंगळवेढा टाईम्स।
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मरवडे येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मरवडे ते मंगळवेढा रस्त्यावरील डॉ. आंबेडकर मैदानासमोर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही अपघात झाला.
विकास जालिंदर मासाळ (वय ४० रा. मरवडे ता. मंगळवेढा) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा चुलतभाऊ दौलत शिवाजी मासाळ याने फिर्याद दिली आहे.
मृत मासाळ हा कामानिमित्त मंगळवेढा येथे आला होता. काम संपवून मरवडेकडे मोटारसायकलवरून एमएच १३ डीडी ५७७२ घरी जात असताना समोरून आलेल्या वाहनाने दुचाकीला ठोकरले. यात मासाळ याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पळून गेला. मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोहेकॉ महेश कोळी करीत आहेत.
पंढरपूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग असताना देखील, या रस्त्यावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे वाहनांचे सातत्याने अपघात होत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज