टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळाची धावपट्टी, धावपट्टीच्या बाजूच्या तांत्रिक गोष्टींची चाचणी घेण्यासाठी एक विमान शनिवारी विमानतळावर उतरले होते. या चाचणीचा अहवाल डीजीसीए आणि एअरपोर्ट अॅथॉरिटीला सादर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. या बैठकीत एकाही सदस्याने सोलापुरातून विमानसेवा कधी सुरू होणार हा प्रश्न विचारला नाही.
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. जिल्हाधिकारी या कामांचा आढावा घेतील आणि तुम्हाला सांगतील असे पालकमंत्री म्हणाले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, विमानतळावरील बहुतांश कामे आता झाली आहेत. अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक विमान आठ महिन्यांनंतर विमानतळावर उतरले. वैमानिकाने धावपट्टी चांगली आहे की नाही हे जाणून घेतले.
धावपट्टीच्या बाजूला लाइट्स असतात. या लाइट्स आणि इतर तांत्रिक कामे व्यवस्थित झाली आहेत की नाही याचाही अंदाज घेतला. विमानतळ व्यवस्थापकांकडून या कामांचा आढावा घेऊन सविस्तर माहिती सोमवारी सांगणार आहोत.
दरम्यान, विमानसेवा सुरू करण्यासाठी जून २०२३ मध्ये चिमणी पाडण्यात आली. जानेवारी महिन्यात विमानतळ बंद झाले आणि कामांना सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्यांदा विमान उतरल्याचे एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी विमानतळ व्यवस्थापक बानोत चांपला उपस्थित होते.
ऑक्टोबरमध्ये सेवा शक्य
विमानतळावरून ऑक्टोबर महिन्यात सेवा सुरू होऊ शकते. त्यादृष्टीने सर्व कामे सुरू आहेत. त्याच्या वेगवेगळ्या तपासणी होतील आणि ते दुरुस्तीही सुचवतील. मात्र या दुरुस्त्या फारशा नसतील. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सेवा सुरू होईल, असा विश्वास आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज