टीम मंगळवेढा टाईम्स मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी येथील एक महिला व खवे येथील एक पुरुष या दोघांना कोरोनाची लागण असताना माहिती लपवून विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी त्या दोघांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरवडे ता.मंगळवेढा येथे आज पुरुष व्यक्ती मुबंईहुन आला आहे. त्यांचेकडे खाजगी कोरोना चाचणी अहवाल असुन पॉझिटिव्ह आहे. म्हणुन त्यांना व त्यांचे निकट संपर्कात असलेला त्यांचा मुलगा या दोघाना मंगळवेढा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणेत आले असुन त्यांचे उपचार करणेत येत आहेत .
तसेच सोडडी ता.मंगळवेढा येथे एक महीला कर्नाटक मधुन आली असुन तिच्याकडे इंडी कर्नाटक येथील कोरोना चाचणी अहवाल असुन तो पॉझिटिव्ह आहे. म्हणुन त्यांना व त्यांचे निकट संपर्कात असलेल्या व्यक्तींना मंगळवेढा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणेत आले असुन त्यांचे उपचार करणेत येत आहेत.
वरील दोन्ही व्यक्तीचे स्वब पुन्हा आपलेकडे घेणार येणार असुन त्यांचे अहवाल प्राप्त झालेनंतर त्यांचे कोरोना चाचणी अहवालाबाबत आधिकृतरीत्या सांगणेत येणार आहे.आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असून नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
त्या दोघाविरूध्द भा.दं.वि.सं.कलम 188,269,270 राष्ट्रीय का .2005 चे कलम 51 ( ब ) , महाराष्ट्र पोलीस कायदा सन 1951 चे कलम 37 ( 3 ) , 135 साथीचे रोग प्रतिबंध अधि . 1857 चे कलम सरकारतर्फे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Information hidden: Crime filed against ‘those’ two corona victims on mangalwedha
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज