टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुलींना मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे.
विद्यार्थिनींना पूर्ण शिक्षण मोफत आहे प्रत्यक्षात विद्यार्थिनींना ट्यूशन फी व परीक्षा शुल्कच फक्त शासनाने माफ केले असून, विद्यार्थिनींना याव्यतिरिक्त असणारी सुमारे १५ टक्के फी भरावीच लागणार आहे. आतापर्यंत विद्यार्थिनींना ५० टक्के शुल्क माफ होते.
त्या वेळी त्यांना महाविद्यालयांच्या एकूण शुल्कापैकी ६० ते ७० टक्के शुल्क दरवर्षी भरावे लागत होते; मात्र नवीन नियमानुसार विद्यार्थिनींना ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत शुल्क माफ होणार असून १५ ते १७ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. असे वृत्त दिव्य मराठी या वृत्तपत्राने प्रसिध्द केले आहे.
शिवाय कला-वाणिज्य, विज्ञान शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर विद्यार्थिनी आणि पालक यांना संपूर्ण १०० टक्के शुल्क माफ करण्यात आल्याचे वाटत आहे.
त्यामुळे विद्यार्थिनी जेव्हा महाविद्यालयात प्रवेशासाठी जात आहे त्यावेळी कोणतेही शुल्क जमा करण्याची आवश्यक नसून, महाविद्यालय उगाचच आपल्याकडे फी मागत असल्याने त्या ठिकाणी वाद होत आहे;
मात्र शासन निर्णयाप्रमाणे महाविद्यालयाच्या एकूण शुल्कापैकी फक्त ट्यूशन फी व परीक्षा फी या दोन्हीचं १०० टक्के माफ करण्यात आल्या आहे. महाविद्यालयांकडून आकारण्यात येणारे इतर डेव्हलपमेंट शुल्क, ड्रेस कोड शुल्क, पात्रता फी, इतर फी ही विद्यार्थिनींना भरावीच लागणार आहे.
योजना फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच : व्यावसायिक
अभ्यासक्रमांना केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग (ईबीसी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क १०० टक्के माफ केले आहे;
मात्र, ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू असून, कला, वाणिज्य, विज्ञान आदी पारंपरिक शाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. या वरुन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज