मिळवा 15,000 रुपये पर्यत डिस्काउंट व 30,000 पर्यंतच्या खरेदी ऑफर आणि 24 महीने हफ्ता ने परतफेड; जाणून घ्या किम्मत आणि माहिती.., संपर्क:- 9975786514/ 9860016060
टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील चोखामेळा चौक गोखले हॉस्पिटल समोरील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी मध्ये सैमसंग कंपनीचा सर्वात महागडा फोन लॉन्च, बघण्यासाठी आणि हाताळण्यासाठी लाईव्ह डेमो उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
आयफोनला टक्कर देणाऱ्या सॅमसंगच्या नव्या फोल्डेबल फोनमध्ये आहे तरी काय? जाणून घ्या किंमत
Samsung Galaxy Z Fold 6: सॅमसंगची नवीन फोल्डेबल सीरिज जागतिक बाजारात आली आहे आणि दोन्ही मॉडेलमध्ये जबरदस्त बदल पाहायला मिळाले आहेत. यातील फोल्ड मध्ये नवीन प्रोसेसर, सुधारित प्रोटेक्शन, गॅलेक्सी एआय आणि ब्राइट डिस्प्ले मिळत आहे.
Samsung नं बहुप्रतीक्षित फोल्डेबल स्मार्टफोनची लाइनअप जागतिक बाजारात लाँच केली आहे, ज्यात the Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 चा समावेश आहे. कंपनीनं दोन्ही फोनच्या डिजाइनमध्ये जास्त बदल केला नाही परंतु स्पेसिफिकेशन्समध्ये बरेच बदल दिसत आहेत. या लेखात आपण गॅलेक्सी झेड फोल्ड 6 ची माहिती घेणार आहोत.
नवीन काय आहे?
गॅलेक्सी झेड फोल्ड 6 गेल्यावर्षी आलेल्या Galaxy Z Fold 5 ची जागा घेईल. कंपनीनं डिजाइन आणि लूक मध्ये बदल केला नाही परंतु स्पेसिफिकेशन्स मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. यात आर्मर अल्युमिनियम 2 आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ची सुरक्षा देण्यात आली आहे.
जुन्या मॉडेलच्या तुलनेत हलका आहे आणि याचे वजन 239g असून गॅलेक्सी झेड फोल्ड 5 चे वजन 253g होते.
कंपनीच्या Galaxy S24 सीरिज प्रमाणे Galaxy Z Fold 6 मध्ये देखील Galaxy AI चा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात ‘नोट असिस्ट’ एआय फिचर देण्यात आलं आहे, जे ट्रान्सलेशन, समरीज आणि ऑटो फॉरमॅटिंग सारखी कामं करू शकतं. तसेच ‘स्केच टू इमेज’ फिचर देखील मिळतं.
स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 मध्ये 7.6 इंचाचा QXGA+ डायनॅमिक अॅमोलेड 2एक्स इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर 6.3 इंचाचा एचडी+ डायनॅमिक अॅमोलेड 2एक्स 120Hz कव्हर डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले 2,600 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतात.
हा फोन क्वॉलकॉम Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह बाजारात आला आहे. त्याचबरोबर 12GB RAM आणि 1TB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
या फोल्डेबल फोनमध्ये एकूण पाच कॅमेरे आहेत. मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 50MP वाइड अँगल कॅमेरा आणि 10MP टेलीफोटो सेन्सर आहे. तर फ्रंटला 10MP चा सेल्फी कॅमेरा आणि 4MP चा अंडर डिस्प्ले कॅमेरा आहे.
किंमत गॅलेक्सी झेड फोल्ड 6 सध्या प्री ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. याची विक्री 24 पासून केली जाईल. याची किंमत 1,64,999 रुपयांपासून सुरु होते. हा फोल्डेबल फोन सिल्व्हर शॅडो, पिंक आणि नेव्ही कलरमध्ये विकत घेता येईल. तर फक्त कंपनीच्या वेबसाइटवरून क्राफटेड ब्लॅक आणि व्हाइट कलर खरेदी करता येईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज