टीम मंगळवेढा टाईम्स।
व्यवसाय करण्यासाठी लागणारी मान्यता प्राप्त वैद्यकीय पदवी व प्रमाणपत्र नसताना कायदेशीर ज्ञान नसताना वैद्यकीय व्यवसाय करून
जनतेच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पश्चिम बंगाल येथील एका बोगस डॉक्टरवर इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सोमनाथ रणजित राक्षे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी मोहोळ तालुक्यातील नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी जाधव, आरोग्य कर्मचारी पथकासह पोलिस ठाण्याचे पोहेकॉ चव्हाण
यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी वाळूज येथील आलोक विश्वास यांच्या दवाखान्यास भेट दिली. यावेळी पथकाने आलोक विश्वास यांच्या दवाखान्यात जाऊन
सोमनाथ रणजित राक्षे याच्यावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे घेत असताना, अलोक विश्वास याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे पडताळणीत मिळून आली नाहीत.
यावेळी डॉ.आलोक विश्वास हा मान्यता प्राप्त पदवी शिवाय व्यवसाय करून पेशंटकडून पैसे घेऊन त्यांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आल्याने डॉ. तेजस्विनी जाधव यांनी फिर्याद दिली.
याप्रकरणी अलोक सुशांत विश्वास यांच्याकडे नोंदणी अगर शैक्षणिक पात्रता दोन्ही गोष्टी नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध
इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९६५ कलम १५ (२) व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट १९६१ चे कलम ३३ (२) नुसार तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२) ३१९ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज