टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील दामाजीनगर परिसरात असलेल्या बनशंकरी कॉलनीतील एका बंगल्याचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम २ लाख ८८ हजार व सोन्या चांदीचे दागिने असा
मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 30 जून रोजी घडली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी चंद्रकांत तुकाराम गोडसे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते.
दुपारी १ वाजता परत आल्यानंतर त्यांना दरवाज्याचे कुलूप व कोयंडा तोडून पडल्याचे लक्षात आले. तद्नंतर त्यांनी घरात प्रवेश करुन पाहणी केली असता
कपाट उचकटून त्यातील १ लाख २० हजार रुपये रोख व इतर सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने नेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
दिसशील तिथे गोळ्या घालीन’,शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘मागील वेळी तू वाचला होता, आता जिथे दिसशील तेथे बंदुकीच्या गोळ्या घालीन,’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांना वाळू माफियाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याबाबत कोळी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. शरद कोळी हे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे उपनेते आहेत.
चार दिवसापूर्वी शरद कोळी यांनी भीमा नदी पात्रातील अवैध वाळू तस्करी करणारे ट्रक पकडून दिले होते. त्यामुळे कुप्रसिद्ध वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याने ही धमकी दिली.
याशिवाय पिंटू पाटील याने सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय देखील जाळून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५१ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज