टीम मंगळवेढा टाईम्स।
भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार नवऱ्याने मोबाइलवर बायकोला शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या तक्रारीवर नवऱ्याविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपासून भारतीय संसदेत जुन्या कायद्यात बदल करून पारीत झालेल्या नवीन कायद्याचा अंमल सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी
पारू गोपाळ पवार (रा. संग्रामनगर, ता. माळशिरस) यांनी १ जुलै २०२४ रोजी त्यांच्या मोबाइल नंबरवर गोपाळ बाबू पवार याने शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार दिली.
यामुळे भारतीय न्याय संहिता २०२३ (बीएनएस) चे कलम ३५१ (४) प्रमाणे गोपाळ पवार विरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात पहिला अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा
पोलिस हवालदार ठोंबरे यांनी दाखल करून पुढील कारवाईसाठी पोलिस हवालदार अभिजीत कुंभार यांच्याकडे देण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज