टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेअर बाजारात गुंतवणूक केली तर एका वर्षानंतर दरमहा कमविलेल्या रकमेवर १० टक्के नफा मिळेल असा विश्वास देत
गुंतवणूक करायला लावून ९१ लाख रुपये गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मनोज चंद्रकांत पवार व रुपेश चंद्रकांत पवार (दोघे रा. संग्रामनगर, ता. माळशिरस) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे असून
याप्रकरणी आकाश अधिकराव मुंजाळ (वय ३६, रा. यशवंतनगर, ता. माळशिरस) यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अकलूज पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी आकाश मुंजाळ यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर
एक वर्षानंतर दरमहा कमविलेल्या रकमेवर १० टक्के नफा मिळेल असे आश्वासन देत गुंतवणूक करावयास लावले.
२८ ऑक्टोबर २०२१ ते १० मे २०२३ या कालावधीत रोख स्वरुपात व आरटीजीएस मार्फत वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यात ९१ लाख रक्कम पाठविण्यास सांगितले.
त्यानंतर त्याचा नफाही व मुद्दलही दिले नाही. त्यानंतर त्या दोघांविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज